टॅक्सीवरून लोबो-गोवा माईल्स आमने सामने !

गोंधळास पर्रीकरच जबाबदार : लोबो


26th January 2021, 12:17 am
टॅक्सीवरून लोबो-गोवा माईल्स आमने सामने !

फोटो : मायकल लोबो
__
प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी : गोवा माईल्स टॅक्सी अॅपला परवाने देताना माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी एकाही आमदाराला विश्वासात घेतले नाही. गोवा माईल्सला परवाने देऊन पर्रीकरांनी जो गोंधळ घालून ठेवला आहे, त्याचे परिणाम आम्हाला भोगावे लागत आहेत, अशी प्रतिक्रिया मंत्री मायकल लोबो यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
गोवा माईल्समुळे स्थानिक टॅक्सीमालक संकटात सापडले आहेत. अॅपवर आधारित ही सेवा स्थानिक, पर्यटकांना योग्य न्याय देत नाही. त्यामुळेच त्यात प्रवेश करण्यासाठी स्थानिक टॅक्सीमालक इच्छुक नाहीत. सेवा चांगली असती तर राज्यातील सर्वच टॅक्सी मालकांनी गोवा माईल्समध्ये प्रवेश केला असता, असे मंत्री लोबो म्हणाले.
स्थानिक टॅक्सीमालक आणि गोवा माईल्समधील वाद संपायचा असेल तर हा प्रश्न केवळ वाहतूक खात्याने हाताळणे आणि पर्यटन खात्याने त्यातून बाहेर पडणे गरजेचे आहे. पर्यटनमंत्री बाबू आजगावकर त्यासाठी तयारही आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
मंत्री मायकल लोबोंचे आरोप
१) गोवा माईल्सला परवाने देताना पर्रीकरांनी विश्वासात घेतले नाही.
२) अॅपवर आधारित सेवा असताना दाबोळी विमानतळावर काऊंटर उघडले.
३) गोवा माईल्सच्या अनेक चालकांकडे बॅच नाहीत.
४) गोवा माईल्सकडून सरकारची फसवणूक सुरू आहे.             

हेही वाचा