Goan Varta News Ad

संशयित प्रथमेश नाईकला पाच दिवस पोलिस कोठडी

आसगाव लैगिक अत्याचार प्रकरण

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
30th October 2020, 11:53 Hrs

म्हापसा : आसगाव येथे २२ वर्षीय महिलेवर बलात्कार प्रकरणी हणजूण पोलिसांनी अटक केलेल्या संशयित प्रथमेश उदय नाईक (२६, आसगाव) यास येथील प्रथम क्षेणी न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तर वैद्यकीय अहवालातून हा लैंगिक अत्याचार संशयिताकडूनच घडल्याचे स्पष्ट झाले आहे.
बुधवारी २८ रोजी पहाटे १च्या सुमारास संशयिताने पीडितेच्या घरात घुसून हा लैंगिक अत्याचार केला होता. गुरुवारी सायंकाळी पोलिसांनी संशयित आरोपी प्रथमेश नाईक यास अटक करून या प्रकरणाचा छडा लावला होता. संशयितास शुक्रवारी सायंकाळी येथील प्रथमश्रेणी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने संशयिताला पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. तसेच पोलिसांनी संशयिताची गोमेकॉमध्ये वैद्यकीय तपासणी केली होती. हा तपासणी अहवालही सकारात्मक आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक महेश केरकर करत आहेत.