Goan Varta News Ad

फेसबुक अकाउंटद्वारे फसवणूक; एकास अटक

महिला असल्याचे भासवून लुबाडले

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
24th October 2020, 10:44 Hrs
फेसबुक अकाउंटद्वारे फसवणूक; एकास अटक

पणजी :  फेसबुकवर महिलेच्या नावाने बनावट अकाऊंट काढून त्याआधारे फोंडा येथील एका व्यक्तीला लग्नाचे आमिष दाखवत त्याच्याकडून सुमारे २३ लाख रुपये उकळल्याप्रकरणी सायबर गुन्हे विभागाने दावणगिरी-कर्नाटक येथून स्व​प्नील नाईक याला शनिवारी अटक केली.       

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित स्वप्नीलने फेसबुकवर महिला असल्याचे भासवत बनावट अकाऊंट उघडून त्याद्वारे आपणास लग्नाचे आमिष दाखवले. त्याद्वारे  २७ जून २०२० ते १६ सप्टेंबर २०२० या कालावधीत आपल्याकडून २३.२१ लाख रुपये उकळले, अशी तक्रार सायबर गुन्हे विभागाकडे पीडित व्यक्तीने दाखल केली होती. त्यानुसार सायबर गुन्हे विभाग संशयित स्वप्नील नाईक याच्या मागावर होता. अखेर सांगली, बंगळुरू, दावणगिरी अशा वारंवार जागा बदलणाऱ्या स्वप्निलला विभागाचे निरीक्षक विश्वेश कर्पे आणि उपनिरीक्षक देवेंद्र पिंगळे यांनी​ कर्नाटक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले.

संशयित स्वप्निल नाईक हा सोशल मीडियाचा वापर करून फसवणूक करण्यातील सराईत गुन्हेगार आहे. यापूर्वी कुडचडे पोलिसांनी त्याला अशाच प्रकारच्या दोन प्रकरणांत अटक केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.