चेन्नई :भारतीय ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदला १ लाख ५० हजार डॉलर बक्षीस रकमेच्या लिजंड्स ऑफ चेस ऑनलाईन टुर्नामेंटमध्ये अखेरच्या फेरीत युक्रेनच्या वॅसिल इवानचूककडून पराभव पत्करावा लागला. या स्पर्धेत आनंदचा हा आठवा पराभव आहे.
स्पर्धेत आनंद ९व्या स्थानावर आहे. त्याच्या मागे केवळ ग्रँडमास्टर पीटर लेको आहे. त्याने अखेरचे स्थान मिळवले आहे.
आनंद व इवानचूक यांच्यामध्ये चार डाव बरोबरीत संपले. यानंतर निर्णय टायब्रेकरवर घशण्यात आला मात्र तोही ५९ चालींनंतर बरोबरीत संपला. युक्रेनच्या खेळाडूने निर्णायक डावात काळ्या मोहरांनी खेळला होता त्यामुळे त्याला विजेता घोषित करण्यात आले.
५० वर्षिय आनंद सात गुणांसह ९व्या स्थानावर राहिला. मॅग्नस कार्लसन टूरवर पदार्पण करताना त्याने एकमेव विजय बोरिस गेलफेंडविरुद्ध नोंदवला होता.
इतर सामन्यांमध्ये जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावरील खेळाडू मॅग्नसन कार्लसनने व्लादिमर क्रॅमनिकचा ३-१ने पराभव करत सुरुवातीच्या फेरीतील सर्व सामने जिंकले. उपांत्य फेरीत नॉर्वेच्या कार्लसनचा सामना पीटर स्वीडलरशी होईल तर हंगेरीच्या अनिष गिरीचा सामन रशियाच्या इयान नेपोमनियाचीशी होणार आहे.