वाळपई–होंडा मार्गावर दुचाकी अपघातात २२ वर्षीय युवक ठार

वाळपई–होंडा मार्गावरील रेडीघाट येथे काल (रविवारी) मध्यरात्री उशिरा दुचाकीला झालेल्या स्वयंअपघातात विशाल गावकर (रा. सोनाळ, सत्तरी) या २२ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
3 hours ago
वाळपई–होंडा मार्गावर दुचाकी अपघातात २२ वर्षीय युवक ठार

वाळपई :  वाळपई–होंडा मार्गावरील रेडीघाट येथे काल (रविवारी) मध्यरात्री उशिरा दुचाकीला झालेल्या स्वयंअपघातात विशाल गावकर (रा. सोनाळ, सत्तरी) या २२ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित युवक दुचाकीवरून वाळपईहून आपल्या  निवासस्थानी येत होता. होंडा औद्योगिक वसाहत परिसरात पोहोचताच  त्याचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि गंभीर जखमी झालेल्या युवकाला  वाळपईतील सामाजिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले असता; डॉक्टरांनी मृतावस्थेच आणल्याचे घोषित केले.              

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा तपास सुरू आहे. 

अपघात वाढले; नियम पाळण्याचे आवाहन

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून जीवघेणे अपघात वाढत आहेत. बायणा येथे उड्डाणपुलावर भरधाव दुचाकीचा अपघात होऊन युवक व युवतीचा मृत्यू झाला. कोलवाळ येथे शनिवारी स्कॉर्पिओची धडक ‘रेन्ट अ बाईक’ स्कूटरला बसून झालेल्या अपघातात आकांक्षा कल्पेश बन्साली जैन (३६ वर्षे, रा. ठाणे, मुंबई) ही महिला ठार झाली. तिचा पती व मुलगी जखमी झाली.

वाढत्या अपघातांच्या मागे  नियम धाब्यावर बसवून किंवा अतिवेगाने वाहन चालवणे हेच कारण असल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर वाहन चालकांनी नियमांचे पालन करून व वेगावण नियंत्रण ठेवून वाहन चालवून स्वत:बरोबर इतरांचाही जीव वाचवावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात येत आहे. 

हेही वाचा
सर्व पहा