शवचिकित्सेनंतरच उघड होणार ‘त्या’ व्यक्तीच्या मृत्यूचे नेमके कारण : कळंगुट पोलीस

कळंगुट येथे गंभीर जखमी स्थितीत सापडला होता; कळंगुट येथे पडल्याने जखमी झालेल्या छत्तीसगडमधील लोहारी बिस्वास (३८ वर्षे) यांचा १२ ऑक्टोबर रोजी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात (गोमेकॉ) (Goa Medical College Hospital (GMC)) मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत घातपाताचा कोणताही संशय नसला तरी; शवचिकित्सेनंतरच नेमके कारण उघड होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. (Calangute Police)

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
36 mins ago
शवचिकित्सेनंतरच उघड होणार ‘त्या’ व्यक्तीच्या मृत्यूचे नेमके कारण : कळंगुट पोलीस

पणजी : कळंगुट येथे पडल्याने जखमी झालेल्या छत्तीसगडमधील लोहारी बिस्वास (३८ वर्षे) यांचा १२ ऑक्टोबर रोजी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात  (गोमेकॉ) (Goa Medical College Hospital (GMC)) मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत घातपाताचा कोणताही संशय नसला तरी; शवचिकित्सेनंतरच नेमके कारण उघड होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. (Calangute Police) 

मिळालेल्या माहितीनुसार, लोहारी बिस्वास हे कळंगुट येथे पडल्याने गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना उपचारासाठी बांबोळी येथील गोमेकॉत दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान १२ ऑक्टोबर रोजी त्यांचे निधन झाले.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली. या चौकशीत सध्या तरी कोणताही घातपात झाल्याचे आढळलेले नाही. मृतदेहाचे शवचिकित्सा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी कळंगुट पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

हेही वाचा
सर्व पहा