पणजी : अकासा एअर या विमान कंपनीकडून गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ (Mopa Manohar International Airport, Goa (Mopa) (मोपा) ते चंदीगड विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. मोपा ते चंदीगड थेट विमानसेवा १ डिसेंबर २०२६ पासून सुरू करण्यात येणार आहे. या नव्या सेवेमुळे गोवा आणि चंदीगडदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
चंदीगड हे अकासा एअरचे भारतातील ३१ वे विमानसेवा केंद्र ठरणार आहे. याशिवाय, कंपनीकडून चंदीगड आणि बेंगळुरू यांच्यातही विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे चंदीरगडमधून देशातील महत्त्वाच्या शहरांशी हवाई संपर्क अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे.
गोवा आणि चंदीगडदरम्यान थेट विमानसेवा सुरू झाल्यामुळे पर्यटक, व्यावसायिक तसेच अन्य प्रवाशांना प्रवासासाठी अधिक सोयीस्कर पर्याय उपलब्ध होईल. विशेषतः पर्यटनाच्या दृष्टीने गोव्याला भेट देणाऱ्या उत्तर भारतातील पर्यटकांसाठी ही सेवा उपयुक्त ठरणार आहे.
मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नव्या मार्गांवरील विमानसेवा सुरू झाल्यामुळे गोव्याची हवाई कनेक्टिव्हिटी वाढण्यास मदत होणार आहे.


