पायलट, तृतीयपंथींना देखील मिळणार डीएसएस योजनेचा लाभ : अधिसूचना जारी

समाज कल्याण खात्यातर्फे दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेमध्ये (डीएसएसएस) बदल करण्यात आला आहे. या योजनेत आता तृतीयपंथी व्यक्ती तसेच दुचाकी पायलटना समाविष्ट करण्यात आले आहे. समावेश करण्यात आला आहे.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
2 hours ago
पायलट, तृतीयपंथींना देखील मिळणार डीएसएस योजनेचा लाभ :  अधिसूचना जारी

पणजी : समाज कल्याण खात्यातर्फे (Social welfare Department) दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेमध्ये (डीएसएसएस) बदल करण्यात आला आहे. या योजनेत आता तृतीयपंथी व्यक्ती तसेच दुचाकी पायलटना समाविष्ट करण्यात आले आहे.

यानुसार किमान दहा वर्षांचा रहिवासी दाखला असणाऱ्या पात्र तृतीय पंथीला प्रति महिना अडीच हजार रुपये देण्यात येतील. याशिवाय ५० ते ६० वर्षे वयाच्या मोटर सायकल पायलट ना महिना २ हजार रुपये तर ६० वर्षांच्या पुढील पायलटना महिना अडीच हजार रुपये देण्यात येणार आहेत. तर जेष्ठ नागरिकांना २ हजार रू., ९० टक्के पेक्षा कमी दिव्यांगत्व असणाऱ्यांना अडीच हजार, ९० टक्के पेक्षा अधिक दिव्यांगत्व असणाऱ्यांना साडेतीन हजार रुपये महिना दिले जातील.

याशिवाय मूल नसलेल्या विधवा महिलांना मासिक ३ हजार रुपये, लहान मुलाचे वय २१ पेक्षा कमी असलेल्या विधवा महिलांना महिन्याला साडेचार हजार तर लहान मुलाचे वय २१ पेक्षा अधिक असलेल्या विधवा महिला तसेच ६० वर्षांवरील महिलांना महिन्याला ३  हजार रुपये देण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार सध्या राज्यातील १.२९ लाखांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ मिळत आहे.

२५ वर्षांपूर्वी ही योजना सुरू झाली होती. यामध्ये वेळोवेळी आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत. जेष्ठ नागरिकांसह, दिव्यांग आणि महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळतो.

वाढत्या महागाईचा विचार करून, योजनेचा पुनः आढावा घेण्यात येऊन लाभ निधीमध्ये वाढ केला जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणांत स्पष्ट केले होते. वाढीव लाभ चालू आर्थिक निश्चितपणे दिला जाईल असेही त्यांनी सांगितले होते. यंदाच्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी ४७९ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

हेही वाचा
सर्व पहा