'ओंकार'ने वेंगुर्ल्यात शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला नाचणीचा घास पळवला

कुडाळनंतर वेंगुर्ल्यात धुमाकूळ; पिकांचे मोठे नुकसान : ‘ओंकार’ हत्तीने आता कुडाळहून वेंगुर्ला तालुक्याकडे आपला मोर्चा वळवला आहे. वेंगुर्ला तालुक्यातील होडावडे गावात या हत्तीने सध्या धुमाकूळ घातला आहे. नाचणी पिकाचे मोठे नुकसान केल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पळवल्याच्या प्रति‌‌‌‌क्र‌िया व्यक्त केल्या जात आहेत. (Omkar Elephant snatches finger millet from vengurla farmers mouth)

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
just now
'ओंकार'ने वेंगुर्ल्यात शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला नाचणीचा घास पळवला

कोरगाव : गेल्या काही दिवसांपासून तळकोकणात धुमाकूळ घालणाऱ्या ‘ओंकार’ हत्तीने आता कुडाळहून वेंगुर्ला तालुक्याकडे आपला मोर्चा वळवला आहे. वेंगुर्ला तालुक्यातील होडावडे गावात या हत्तीने सध्या धुमाकूळ घातला आहे. नाचणी पिकाचे मोठे नुकसान केल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पळवल्याच्या प्रति‌‌‌‌क्र‌िया व्यक्त केल्या जात आहेत. (Omkar snatches finger millet from vengurla farmers mouth) 

हत्ती गावात दाखल झाल्याची माहिती पसरताच त्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांसह बघ्यांनी मोठी गर्दी केली. होडावडे परिसरातील शेतात शिरलेल्या ओंकार हत्तीने नाचणी पिकावर ताव मारला. यामुळे हाताशी आलेल्या नाचणी पिकाचे मोठे नुकसान झाले. अाणि शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. आधीच हत्तीच्या उपद्रवामुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता नव्या संकटाने डोके वर काढले आहे.

दरम्यान, हत्तीला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असल्याने संभाव्य धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी गर्दी करू नये तसेच हत्तीच्या जवळ जाण्याचा किंवा त्याला डिवचण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन वनविभागाने केले आहे.

वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. ओंकार हत्तीच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. हत्तीचा पुढील प्रवास कोणत्या दिशेने होणार, याकडे परिसरातील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा
सर्व पहा