रात्री झोपले सकाळी उठलेच नाहीत; दाबोळीतील हॉटेलच्या खोलीत व्यवस्थापकाचा मृत्यू

दाबोळी येथील अथी हॉटेलमध्ये सहाय्यक व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेल्या ३९ वर्षीय दीपक मोहन यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (११ नोव्हेंबर) उघडकीस आली. (Manager dies in hotel room in-dabolim did not wake up after sleeping at night).

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
9 mins ago
रात्री झोपले सकाळी उठलेच नाहीत; दाबोळीतील हॉटेलच्या खोलीत व्यवस्थापकाचा मृत्यू

वास्को : दाबोळी येथील अथी हॉटेलमध्ये सहाय्यक व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेल्या ३९ वर्षीय दीपक मोहन यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (११ नोव्हेंबर) उघडकीस आली. (Manager dies in hotel room in-dabolim did not wake up after sleeping at night). हॉटेलच्या खोलीत ते बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांना तातडीने चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दीपक मोहन हे मूळचे दिल्लीतील द्वारका येथील रहिवासी होते. ते सध्या बोगमाळो बीच रोड परिसरात राहत होते. अथी रिसॉर्टमध्ये सहाय्यक व्यवस्थापक म्हणून काम करत असल्याने ते हॉटेलमधील एका खोलीत कुत्रे आणि मांजरांसह एकटेच राहत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, १० नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास ते झोपण्यासाठी गेले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजेपर्यंत ते खोलीबाहेर आले नाहीत. हॉटेल कर्मचाऱ्यांनी दरवाजा ठोठावून तसेच हाका मारूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे हॉटेलमधील स्वयंपाकी तारा यांनी मागील बाजूच्या सरकत्या खिडकीतून खोलीत प्रवेश केला. त्यावेळी दीपक हे पलंगावर बेशुद्धावस्थेत पडलेले आढळले.

त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून चिखली उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह पुढील वैद्यकीय व कायदेशीर प्रक्रियेसाठी दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय, मडगाव येथे ठेवला आहे.

या प्रकरणी पुढील तपास वास्को पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश वेळीप करीत आहेत. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.