म्हापसा : टाकीकडे-करासवाडा, म्हापसा येथील जीर्ण झालेल्या बसथांब्याची शेड कोसळली. काल रविवारी मध्यरात्री मुसळधार पडलेल्या अवकाळी पावसामुळे ही घटना घडली. मात्र, बसथांब्याची शेड ज्या पद्धतीने पडली आहे ते पाहिल्यास कुणीतरी मुद्दामहून पाडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. बसथांब्याची कोसळली की पाडली अशी चर्चा सुरू झाली आहे.
या बस थांब्याचा रहिवासी आणि औद्योगिक वसाहतीमधील प्रवासी कामगार वर्ग वापर करत होते. सुदैवाने ही घटना रात्रीची घडल्याने मोठी दुर्घटना टळली. रविवारी १ रोजी मध्यरात्री मुसळधार पाऊस कोसळला. पावसामुळे देखभालीअभावी जीर्ण झालेल्या बसथांब्याची शेड पडल्याचे दिसत आहे.
पडली की पाडली ?
दरम्यान, या बसथांब्याची शेड जमिनीवर पाडल्याप्रमाणे कोसळली आहे. त्यामुळे पावसामुळे कोसळली की कुणीतरी पावसाच्या आडून पाडली, अशी चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे.


