बॉम्बची धमकी; दक्षिण, उत्तर गोवा जिल्हा न्यायालयांची तपासणी

बॉम्बची धमकी; दक्षिण, उत्तर गोवा जिल्हा न्यायालयांची तपासणी; देशातील न्यायालयांत बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल तपास यंत्रणांना प्राप्त झाल्यानंतर गोव्यातील न्यायालयांची तपासणी करण्यात आली. दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि संबंधित तपास यंत्रणांनी कडक सुरक्षाव्यवस्थेत दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालय South Goa District and Session Court) इमारतीची पू्र्ण तपासणी केली. मात्र, त्यात काही सापडले नाही. उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालय (North Goa District and Session Court) इमारतीची तपासणी हाती घेण्यात आली होती.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
3 hours ago
बॉम्बची  धमकी; दक्षिण, उत्तर गोवा जिल्हा न्यायालयांची तपासणी

पणजी : देशातील न्यायालयांत बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल तपास यंत्रणांना प्राप्त झाल्यानंतर गोव्यातील न्यायालयांची तपासणी करण्यात आली. दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि संबंधित तपास यंत्रणांनी कडक सुरक्षाव्यवस्थेत दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालय South Goa District and Session Court)  इमारतीची पू्र्ण तपासणी केली. मात्र, त्यात काही सापडले नाही. उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालय (North Goa District and Session Court) इमारतीची तपासणी हाती घेण्यात आली होती.

राजस्थान येथून देशातील न्यायालय इमारतींत बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल तपास यंत्रणांना प्राप्त झाला होता. त्यामुळे एकच खळबळ माजली. त्यानंतर सुरक्षेच्यादृष्टीने न्यायालयांची तपासणी करण्यात आली. त्याअंतर्गत गोव्यातील न्यायालयांची तपासणी करण्यात आली. एटीएस व संबंधित तपास यंत्रणांनी बॉम्ब शोध पथक, श्वान पथक यांच्यासहीत न्यायालयांची तपासणी केली.

गोव्यातील  न्यायालयांच्या परिसरात बॉम्ब ठेवल्याचा दावा करणारा धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्यानंतर राज्यातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या.  या धमकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील न्यायालयांची बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी करण्यात आली.

दक्षिण गोवा जिल्हा न्यायालय परिसराची सुरक्षा यंत्रणांनी कसून पाहणी केली. या तपासणीमोहिमेत बॉम्बशोधक पथक (बॉम्ब स्कॉड), जिल्हा पोलीस, दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि अग्निशामक दलाच्या जवानांचा सहभाग होता.

ई-मेलची गांभीर्याने दखल

धमकीचा ई-मेल मिळताच संबंधित यंत्रणांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. न्यायालयांच्या इमारती, परिसर तसेच संशयास्पद वस्तूंची तपासणी करून संभाव्य धोका पडताळण्यात आला. अचानक सुरू झालेल्या या तपासणी मोहिमेमुळे न्यायालयीन परिसरात सतर्कतेचे वातावरण निर्माण झाले.

सुरक्षा यंत्रणांकडून खबरदारी 

दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा यंत्रणांकडून खबरदारी घेण्यात येत आहे. धमकीच्या ई-मेलची गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे.

हेही वाचा
सर्व पहा