राजकीय संन्यास संपला; मनोज परब यांची उद्या घरवापसी

मनोज परब हे पक्षात उद्या रविवारी घरवापसी करणार आहेत. शनिवारी सोशल मिडीयावर त्यांनी ही घोषणा केली. पर्वरी जाहीर सभेत ते पक्षात परत प्रवेश करणार आहेत.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
5 hours ago
राजकीय संन्यास संपला; मनोज परब यांची उद्या घरवापसी

पणजीः मनोज परब (Manoj Parab)  हे पक्षात उद्या रविवारी घरवापसी करणार आहेत. (Manoj Parab returns home tomorrow; Political retirement ends) शनिवारी सोशल मिडीयावर त्यांनी ही घोषणा केली. पर्वरी जाहीर सभेत ते पक्षात परत प्रवेश करणार आहेत.

आरजीपीत (Revolutionary Goans Party RGP) अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर आरजीपीचे सुप्रीमो मनोज परब यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन राजकारणातून संन्यास घेत असल्याचे जाहीर केले होते. गेले सहा मह‌िने परब हे संपर्कात नव्हते पण सोशल मिडीयावर ते सक्रीय होते.

मागील काही महिने ते सोशल मिडीयावर बरेच सक्र‌िय होऊन त्यांनी वीरेश बोरकर यांच्यावर टीका करणे सुरू केले होते. अशाच एका फेसबूक पोस्टात त्यांनी आपला संन्यास सोडून परत राजकारणा सक्रीय होत असल्याचे जाहीर केले.

परब यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, तुमच्यातील प्रत्येकासाठी मी परत येत आहे, जे माझ्यावर प्रेम करतात, माझ्यावर विश्वास ठेवतात आणि माझ्याकडे आशेने पाहतात. तुमचा बिनशर्त आधार, तुमचे आसू, तुमचा संदेश आणि आमच्या मिशनवर तुमचा अखंड विश्वास, यासाठी आग (उजो) जीवंत ठेवला आहे.

गोवा, गोमंतकीय आणि आमच्या मायभूमीच्या भविष्यासाठी आमचा लढा सुरू राहणार आहे. खरे म्हटल्यास उद्या एक बळकट अध्याय सुरू होतो. मी अधिकृतपणाने रेव्ह्युलेशनरी गोवन्स पक्षात परत येताना माझ्या सोबत सहभागी व्हा, असे आवाहन परब यांनी केले आहे.

मनोज परब रविवारी संध्याकाळी ३ वाजता संत गाडगे महाराज सभागृहात पर्वरी येथे जाहीर सभेत आरजीपीत प्रवेश करणार. परब परत आले म्हणून पक्षातील वाद संपणार नाही. परब गट आणि वीरेश बोरकर गट या दोघांनीही पक्षावर आपला दावा केला आहे. पण खरा पक्ष कुणाचा ते अजून स्पष्ट झालेले नाही.

हेही वाचा
सर्व पहा