बनावट ई-चलन लिंकद्वारे आगशीतील व्यक्तीची २.८५ लाखांची फसवणूक

मोबाईलवर आलेली ‌लिंक उघडताच ‘एपीके’ अॅप डाउनलोड; बँक खात्यातून रक्कम लंपास : बनावट वाहतूक दंडाची लिंक (ई-चलन) पाठवून आगशी येथील एका व्यक्तीच्या बँक खात्यातून तब्बल २ लाख ८५ हजार ९९३ रुपये परस्पर काढून घेतल्याचा प्रकार समोर आली आहे. याप्रकरणी आगशी पोलिसांनी अज्ञाताविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
30 mins ago
बनावट ई-चलन लिंकद्वारे आगशीतील व्यक्तीची २.८५ लाखांची फसवणूक

आगशी : बनावट वाहतूक दंडाची लिंक (ई-चलन) पाठवून आगशी येथील एका व्यक्तीच्या बँक खात्यातून तब्बल २ लाख ८५ हजार ९९३ रुपये परस्पर काढून घेतल्याचा प्रकार समोर आली आहे. याप्रकरणी आगशी पोलिसांनी अज्ञाताविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तपेंद्र खडकर (४०, रा. बांबोळी) यांना ७ ते १२ सप्टेंबरदरम्यान एका अज्ञात व्यक्तीने मोबाईल क्रमांकावरून एक लिंक पाठवली. ही लिंक त्यांच्या वाहनाशी संबंधित ‘रेड लाईट ट्रॅफिक सिग्नल’चा नियम तोडल्याच्या चलनाची असल्याचे भासवण्यात आले होते. 

लिंक खरी असल्याचे समजून तक्रारदाराने ती उघडली. त्यानंतर त्यांच्या मोबाईलमध्ये अनोळखी एपीके फाईल/अॅप्ल‌िकेशन डाउनलोड व इन्स्टॉल झाले. या बनावट अ‍ॅपच्या माध्यमातून तक्रारदाराच्या ‘बँक ऑफ इंडिया’च्या खात्यातून त्यांच्या संमतीशिवाय वेगवेगळ्या व्यवहारांद्वारे एकूण २ लाख ८५ हजार ९९३ रुपये वळते करण्यात आले.

या प्रकरणी सायबर क्राईम पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या झिरो एफआयआरच्या आधारे आगशी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१८(४) आणि ३१९(२) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रक्षा नाईक करीत आहे. 

हेही वाचा
सर्व पहा