बायणा समुद्रकिनाऱ्याजवळ मासेमारी होडी उलटली; १० कामगार सुखरूप

बायणा समुद्रकिनाऱ्यावर १० कामगारांना घेऊन जाणारी मासेमारी होडी अचानक उलटण्याची घटना घडली. या घटनेमुळे काही काळ परिसरात खळबळ उडाली. मात्र, सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
बायणा समुद्रकिनाऱ्याजवळ मासेमारी होडी उलटली; १० कामगार सुखरूप

वास्को : बायणा समुद्रकिनाऱ्यावर १० कामगारांना घेऊन जाणारी मासेमारी होडी अचानक उलटण्याची घटना घडली. या घटनेमुळे काही काळ परिसरात खळबळ उडाली. मात्र, सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

होडीतील सर्व १० कामगार सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे. दुर्घटनेनंतर बचावकार्य करण्यात आले व सर्व कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. समुद्रात होडी उलटल्याचे दिसताच किनाऱ्यावर असलेल्यांनी मदत करण्यासाठी धाव घेतली. होडीतील १० जणांनी पोहून किनारा गाठला. यावेळी मदतीसाठी जेट स्कीचाही वापर करण्यात आला. दोरी बांधून होडी किनाऱ्यावर आणण्यात आली.

होडी उलटण्याच्या घटना धोकादायक

दरम्यान, गेल्या काही महिन्यात समुद्रात होडी उलटण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. आणि अशा घटना धोकादायकही ठरत आहेत. कांदोळी येथे अशीच मच्छीमारी उलटली होती. मात्र, सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले होते.

गेल्या काही दिवसांमागे कांदोळी येथेच घडलेल्या घटनेत मच्छीमारीसाठी गेलेला एक स्थानिक युवक फिट्स येऊन समुद्रात पडून मृत्यू पावला होता. होडी उलटण्याच्या घटना धोकादायक ठरत आहेत. आणि जीवावर बेतण्याची शक्यता असल्याने जोखीम पत्करूनच मच्छीमारी करावी लागत असल्याचे काही मच्छीमारांनी सांगितले. 

हेही वाचा
सर्व पहा