वाळपई : पर्ये-सत्तरी येथील जीआयएम (GIM) वसतिगृहात झोपलेल्या रूममेटवर दुसऱ्या विद्यार्थीनीने चाकूने हल्ला केला. याप्रकरणी वाळपई पोलिसांनी सुकन्या सब्भानी (२६ वर्षे) या विद्यार्थीनी विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. हल्ल्यात विद्यार्थीनी गंभीर जखमी झाली आहे. आरोपावरून २६ वर्षीय GIM विद्यार्थिनी सुकन्या सब्भानी हिच्याविरोधात वाळपई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थिनीने तिची रूममेट झोपेत असताना तिच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात पीडित तरुणीच्या गळ्यावर आणि हातांवर गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या.
हल्ल्यानंतर पीडितेला ठार मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. घटनेनंतर वसतिगृह परिसरात खळबळ उडाली.
या प्रकरणी वाळपई पोलिसांनी तक्रारीच्या आधारे सुकन्या सब्भानी हिच्याविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. हल्ल्यामागील नेमके कारण काय होते, याचा पोलीस तपास करीत आहेत. याप्रकरणातील पुढील तपशील तपासानंतर स्पष्ट होणार आहे.


