ट्रम्प यांची नेतान्याहूंवर टीका; हल्ले न थांबल्यास कठोर प्रत्युत्तर : इराण

तेल अवीव/बेयरूत : दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायली सैन्याने केलेल्या हल्ल्यांमध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याने मध्यपूर्वेतील तणाव पुन्हा वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यावर टीका करत लेबनॉनच्या प्रश्नात अधिक जबाबदारीने वागण्याचा सल्ला दिला आहे.
हल्ले न थांबल्यास कठोर प्रत्युत्तर : इराण
इराणने आरोप केला आहे की, तेहरान आणि अमेरिकेदरम्यान झालेल्या सामंजस्य करारानंतर इस्रायलने लेबनॉनमधील युद्धविरामाचे तब्बल ८४ वेळा उल्लंघन केले आहे. (Iran has accused Israel of violating the truce in Lebanon 84 times since the memorandum of understanding was agreed to between Tehran and the US) हे हल्ले थांबले नाहीत तर कठोर प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशाराही इराणने दिला आहे.
इस्त्रायली सैन्याने माघार घेणे आवश्यक : इराण
इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी स्पष्ट केले की, अमेरिकेसोबत होणाऱ्या कोणत्याही करारामध्ये गोठवलेली इराणी मालमत्ता मुक्त करणे, आर्थिक निर्बंध हटवणे आणि इस्रायली सैन्याने लेबनॉनमधून माघार घेणे या अटींचा समावेश असणे आवश्यक आहे.
दरम्यान, इस्रायलचे अर्थमंत्री बेझालेल स्मोट्रिच यांनी १९९७ मधील हेब्रोन करार रद्द केल्याचा दावा केला आहे. या निर्णयामुळे वेस्ट बँकमधील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक असलेल्या हेब्रोनमधील पॅलेस्टिनी नगरपालिकेचे बांधकामासंदर्भातील अधिकार कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.