लेबनॉन युद्धविरामाच्या घोषणेनंतरही इस्रायली हल्ले; गाझामध्ये ९ ठार, अनेक जखमी

अमेरिका-इराण युदध; ट्रम्प यांच्या अधिकारांवर मर्यादा आणणारा ठराव मंजूर

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
25 mins ago
लेबनॉन युद्धविरामाच्या घोषणेनंतरही इस्रायली हल्ले; गाझामध्ये ९ ठार, अनेक जखमी

बैरुत :  वॉशिंग्टनमध्ये इस्रायल आणि लेबनॉनच्या अधिकाऱ्यांमध्ये युद्ध थांबवण्याबाबत सहमती झाल्यानंतरही लेबनॉनमध्ये तणाव कायम असून, इस्रायली ड्रोन हल्ल्यात एका वाहनाला लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

युद्धविरामाच्या घोषणेपूर्वी हिजबुल्लाहने दक्षिण लेबनॉनमधील इस्रायली सैनिकांवर रॉकेट्सचा मारा केल्याचा दावा केला. तसेच धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या ब्यूफोर्ट किल्ल्याजवळ ड्रोन हल्ले केल्याचेही सांगितले.

ट्रम्प यांच्या अधिकारांवर मर्यादा आणणारा ठराव मंजूर

दरम्यान, अमेरिकन संसदेच्या प्रतिनिधीगृहाने अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या काँग्रेसच्या मंजुरीशिवाय इराणवर हल्ला करण्याच्या अधिकारांवर मर्यादा आणणारा ठराव २१५ विरुद्ध २०८ मतांनी मंजूर केला. 

गाझा येथे हवाई हल्ल्यात ९ ठार 

दुसरीकडे, गाझा शहरातील एका निवासी इमारतीवर झालेल्या इस्रायली हवाई हल्ल्यात किमान ९ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये चार लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती आहे.