दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक संतोष देसाई शासकीय सेवेतून निवृत्त

कोकण रेल्वेचे पोलीस अधीक्षक शेखर प्रभुदेसाई यांच्याकडे सोपवला अतिरिक्त कार्यभार

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
3 hours ago
दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक संतोष देसाई शासकीय सेवेतून निवृत्त

मडगाव : दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक संतोष देसाई हे ३१ मे रोजी शासकीय सेवेतून निवृत्त झाले. त्यांच्या निवृत्तीनंतर रिक्त झालेल्या या महत्त्वाच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार कोकण रेल्वेचे पोलीस अधीक्षक शेखर प्रभुदेसाई यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

गोवा पोलीस प्रशासनाने जारी केलेल्या अधिकृत आदेशानुसार, पुढील आदेश येईपर्यंत शेखर प्रभुदेसाई यांच्याकडे ही अतिरिक्त जबाबदारी असेल. माजी पोलीस अधीक्षक संतोष देसाई यांनी आपल्या प्रदीर्घ कार्यकाळात दक्षिण गोव्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती.

आता त्यांच्या निवृत्तीनंतर, आगामी काळातील आव्हाने आणि पोलीस प्रशासनातील सुसूत्रता लक्षात घेऊन पोलीस महासंचालक (DGP) के. आर. चौरसिया यांनी शेखर प्रभुदेसाई यांच्यावर विश्वास दाखवत हा अतिरिक्त ताबा दिला आहे. आदेश जारी होताच प्रभुदेसाई यांनी आपल्या पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला आहे.

हेही वाचा