जखमी इसमावर गोमेकॉत उपचार

पणजी : पैठण-साल्वादोर द मुंद, पर्वरी येथे घरगुती वादाला हिंसक वळण लागले. त्यात बाबलो गडकर (४८ वर्षे) यांच्यावर सुरी हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ) दाखल करण्यात आले. याप्रकरणी पर्वरी पोलिसांनी रोहीत धुमाळे (वझरी, पेडणे) याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घरातील किरकोळ वादातून हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणी पर्वरी पोलिसांनी (Porvorim Police) तातडीने कारवाई करत रोहीत धुमाळे याला अटक केली. पुढील तपास सुरू आहे. बाबलो गडकर कदंबा वाहतूक महामंडळात चालक म्हणून नोकरी करीत आहेत.