गोवा शालान्त व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर होणार उपलब्ध

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गोवा शालान्त व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २०२६ मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल रविवार, २६ एप्रिल रोजी सायं. ५ वा. शालान्त मंडळाच्या ‘मंथन’ सभागृहात जाहीर केला जाणार आहे. ही दहावीची परीक्षा १३ मार्च २०२६ ते ९ एप्रिल २०२६ या २० दिवसांच्या कालावधीत पार पडली. राज्यभरातील एकूण ३२ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती. १०,८१९ मुले आणि ९,८४० मुली, असे एकूण २०,६५९ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. याशिवाय काही खासगी विद्यार्थ्यांनीही ही परीक्षा दिली आहे. विद्यार्थ्यांचा निकाल गोवा बोर्डाच्या http://results.gbshsegon.net/#/ या अधिकृत वेबसाईटवर तसेच ‘डिजिलॉकर’ अॅपवर उपलब्ध असेल, असे मंडळाने कळवले आहे.