एकूण ३.२ लाख नोंदी : ऐतिहासिक, सार्वजनिक, न्यायालयीन, महसूल, लष्करी कागदपत्रांचा समावेश

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गोवा राज्याच्या ऐतिहासिक वारशाचे जतन करणाऱ्या अभिलेखागार व पुरातत्व संचालनालयाकडे सध्या ३,०२,२५० नोंदी असून त्यामधील २,७२,१५,७३० पाने सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. या नोंदींमध्ये ऐतिहासिक, सार्वजनिक, न्यायालयीन, महसूल, लष्करी तसेच इतर विभागांतील महत्त्वपूर्ण कागदपत्रांचा समावेश आहे.
न्यायालयीन नोंदींचा सर्वाधिक साठा असून २,०४,७२९ नोंदींमध्ये १,६१,५९,०४२ पाने आहेत. ऐतिहासिक नोंदींची संख्या ११,१८३ (३०,५९,७४९ पाने) असून सार्वजनिक नोंदींमध्ये (बाप्तिस्मा, जन्म, विवाह, मृत्यू) ९,५४४ नोंदी व १६,३३,७३२ पाने जतन आहेत.
कोमुनिदाद, महसूल, लष्करी, पोलीस, लेखा संचालनालय, मुरगाव पोर्ट ट्रस्ट, कलेक्टर कार्यालय तसेच इंटेन्डेन्सिया विभागातील हजारो फाइल्सही जतन करण्यात आल्या आहेत. संचालनालयाने या दस्तऐवजांचे डिजिटायझेशन करण्याचे कामही हाती घेतले आहे.
अभिलेखागार व पुरातत्व संचालनालयाकडे असलेल्या नोंदी
एकूण नोंदी : ३,०२,२५०
एकूण पाने : २,७२,१५,७३०
न्यायालयीन नोंदी : २,०४,७२९
ऐतिहासिक नोंदी : ११,१८३
सार्वजनिक नोंदी : ९,५४४
कोमुनिदाद नोंदी : २३,०६२
लष्करी नोंदी : ९,७५५
डिजिटायझेशनची प्रगती
शासकीय राजपत्र (१८४१-१९६१), कायदे (१९०१-१९६१) व दुर्मिळ पुस्तके (१६९७-१९६०) यांचे ४९९ खंडांतील सुमारे २,९३,०२९ पाने स्कॅन
४५०० मोडी-मराठी हस्तलिखिते डिजिटल स्वरूपात
कॅप्टन ऑफ पोर्ट्स संबंधित १४५ खंडांतील ८,४०३ नोंदी
प्रवास दस्तऐवजांच्या २१० खंडांतील १,८४,४४२ नोंदी डिजिटाइज
बार्देश व डिचोली भू-नोंदणीची २,७१,५७९ पाने स्कॅन
नोटरी रेकॉर्डची १५,३६,६३१ पाने व इन्व्हेंटरी कोर्ट रेकॉर्डची २१,०८,२६९ पाने डिजिटाइज