
पणजी : माजी मुख्यमंत्री तथा माजी कृषीमंत्री रवी नाईक यांचे पुत्र रितेश नाईक (Ritesh Ravi NaiK) यांची फोंडा (Ponda) येथील राजीव गांधी कला मंदिराच्या (Rajiv Gandhi Kala Mandir) अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश कला व संस्कृती खात्यातर्फे जारी करण्यात आला आहे. कला व संस्कृती खात्याने यासंदर्भातील आदेश काल सोमवारी जारी केला. दरम्यान, राजीव गांधी कला मंदिराच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रितेश नाईक यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.