बाणावलीतील बेकायदा ‘युवर स्टोरी रेस्टॉरंट’ सील

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
2 hours ago
बाणावलीतील बेकायदा ‘युवर स्टोरी रेस्टॉरंट’ सील

मडगाव : बाणावली (Benaulim)  किनारी भागातील ‘युवर स्टोरी’ (Your Story) या रेस्टॉरंटकडे (Restaurant) व्यापार परवाना, अग्निशामक दलाचा परवाना किंवा इतर कोणतीही परवानगी नव्हती. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून (District Administration) सदर रेस्टॉरंट सील करण्यात आले.

बाणावली किनारी भागात कार्यरत असलेले ‘युवर स्टोरी’ हे रेस्टॉरंट कोणत्याही परवानगीशिवाय सुरु होते. जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये या रेस्टॉरंटकडे व्यापार परवान्यासह कोणतीही परवानगी नसल्याचे आढळून आले होते. गुरुवारी सकाळी अधिकारी रोहित कदम यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बाणावलीतील युवर स्टोरी हे बेकायदेशीरपणे चालणारे रेस्टॉरंट सील केले. यावेळी कदम यांनी सांगितले की, युवर स्टोरी या रेस्टॉरंटकडे व्यापार करण्यासाठी आवश्यक परवाना नव्हता. त्याशिवाय अग्निशामक दलाकडून परवाना घेतलेला नाही किंवा इतरही कोणते परवाने नसल्याचे आढळून आले. त्यानुसार आता हे रेस्टॉरंट सील करण्यात आले. त्यांना आवश्यक परवानग्या घेण्यासाठी संबंधित अधिकारीणीकडे अर्ज सादर करण्याच्या सूचना केलेल्या आहेत, असेही ते म्हणाले.


हेही वाचा