ओळख पटवून संपर्क करून घेऊन जाण्याचे चित्रसेन यांचे आवाहन

पणजी : गोव्यातील (Goa) म्हार्दोळ (Mardol) येथे एका महिलेला नवा किंमती मोबाईल संच (Mobile or Cell Phone) मिळाल्यानंतर तिने तो आपल्या पतीकडे दिला आहे. पती व पत्नी प्रामाणिकपणे हा मोबाईल संच परत करायला तयार असून, कुणाचा असेल त्यांनी ओळख दाखवून घेऊन जावा; असे आवाहन केले आहे.
यासंदर्भात सापडलेला मोबाईल संच ज्यांच्याकडे आहे ते चित्रसेन बिस्वाल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आपली पत्नी श्री शांतादुर्गा मंदिरात (Shri Shantadurga Temple) गेली होती. म्हार्दोळ येथे बसमध्ये चढत असताना त्यांना रस्त्यावर पडलेला मोबाईल संच सापडला. यावेळी बसमध्ये खूप गर्दी होती. पत्नीने घरी आल्यावर आपल्याकडे दिला. कुणाला तरी ‘गिफ्ट’ करण्यासाठी तो घेतला असावा व त्याची किंमत सुमारे ४२ हजार रुपये असावी. आपण कुंडई (Kundai) येथे राहतो. ज्याचा कुणाचा असेल त्याला आपण सांगेल तेथे आणून द्यायला तयार आहे. केवळ त्यांना मोबाईल संचची ओळख व्यवस्थित सांगावी लागणार आहे. अधिक माहितीसाठी चित्रसेन बिस्वाल यांनी आपला मोबाईल क्रमांक दिला असून, ९१५८२७७८८५ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, चित्रसेन बिस्वाल व त्यांच्या पत्नीचा प्रामाणिकपणा वाखाण्यासारखा असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.