महासागराचे पाणी बनतेय अॅसिडिक; ताटातील मासळीला धोका

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
6 hours ago
महासागराचे पाणी बनतेय अॅसिडिक; ताटातील मासळीला धोका

नवी दिल्ली : जगातील (World) अनेक भागातील महासागराचे पाणी (Ocean acidification) पू्र्वी पेक्षा अधिक वेगाने अॅसि‌डिक होत असल्याचे एका अभ्यासात पुढे आले आहे. त्यामुळे ताटातील मासळी (Fish) गायब होण्याचा धोका संभवत असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. 

स्कॉटलॅंडच्या युनिव्हर्स‌िटी ऑफ सेंट अॅंड्रयूजने (Scotland University) केलेल्या संशोधनात ही माहिती पुढे आली आहे. या संशोधनातून गांभीर्यपूर्वक इशारा देण्यात आला आहे की, जगातील अनेक किनारी भाग पूर्व‌ीपेक्षा अधिक वेगाने आम्लधर्मी (अॅसिडिक) होत आहेत. कार्बन डायऑक्साईडच्या वाढीमुळे होत असलेल्या सामान्य अॅसिडिफिकेशनपेक्षा ही प्रक्रिया अधिक वेगाने होत आहे. त्यामुळे जास्त करून मत्स्य व्यवसायाला अधिक धोका असून, आर्थ‌िक अर्थव्यवस्थेवरही जबर परिणाम होण्याचा धोका वर्तवला आहे.

२० व्या शतकातील कोरल नमुन्यांचा संशोधकांनी बोरोन आइसोटोप वापरून अभ्यास केला. समुद्रातील पाण्याची पीएच पातळी घसरली आहे. २१ व्या शतकात अधिक वेगाने घसरण होण्याची चिन्हे दिसत आहेत. जगभरातील सागरी जीवसृष्टी व त्यावर विसंबून असलेल्या अर्थव्यवस्थेला गंभीर धोका संभवत आहे. कोळंबी, मासे, शिंपले, प्रवाळ यांसारखे समुद्री जीव वेगाने नष्ट होण्याचा धोका आहे. 

पाणी अॅसिडिक होण्याची कारणे

वातावरणातील कार्बन डायऑक्साईड समुद्राच्या पाण्यात पूर्वीपेणा जास्त वेगाने विरघळत आहे. त्यामुळे पाण्याचा पीएच सतत कमी होत आहे. सातत्याने होत असलेल्या या प्रक्र‌ियेमुळे समुद्राच्या खोल भागातील पाण पृष्ठभागावर येते. सध्या ते अधिक अॅसिडीक बनले आहे. हे अॅसिडिक पाणी पृष्ठभागावर येताच हवेतील कार्बन डायऑक्साईडच्या संपर्कात येते व त्यामुळे अनेक पटीने अॅसिडिक बनत आहे.



हेही वाचा