इंडिगोची विमान सेवा आठव्या दिवशीही रुसलेलीच; ६१० कोटींच्या तिकीटांची परतफेड

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
11 hours ago
इंडिगोची विमान सेवा आठव्या दिवशीही रुसलेलीच; ६१० कोटींच्या तिकीटांची परतफेड

नवी दिल्ली : इंडिगोच्या विमान (Indigo Flights) सेवेत आठव्या दिवशीही विशेष सुधारणा नसून, विमान उड्डाणे रद्द झाल्याने ६१० कोटी रुपये तिकीटाच्या परतफेडीच्या रुपात द्यावे लागले आहेत. 

भारतभरातील (India) अनेक विमानतळांवर (Airport) इंडिगोची विमान सेवा सुरळीत झाली नसल्याने, प्रवाशांवर कठीण परिस्थिती ओढवली आहे. १० डिसेंबर पासून विमान सेवा सुरळीत होण्याची आशा कंपनीतर्फे व्यक्त करण्यात आली आहे. 

एअरलाइनच्या उड्डाणांना व्यत्यय येऊ शकतो, असे दिल्ली विमानतळाने सोमवारी प्रवाशांसाठी जारी केलेल्या सूचनेत म्हटले आहे. इंडिगोची विमान उड्डाणे रद्द झाल्याने, मुंबई, दिल्ली या प्रमुख विमानतळांवर प्रवासी संतप्त झाल्याचे दिसत होते. 

अधिकारी म्हणतात की, इंडिगोची विमान उड्डाणे रद्द झाल्याने ६१० कोटींहून अधिक रक्कम तिकीटाच्या परतफेडीच्या रुपात प्रवाशांना परत करण्यात आले आहेत. फ्लाइट डयुटी टाइम लिमिटेशन नियमांची (पायलट ‌आरामावरील सरकारी नियम) अंमलबजावणी करण्यात आल्यानंतर कॉकपिट क्रूची संख्या कमी पडू लागल्याने या संकटाचा सामना करावा लागला.

त्यामुळेच विमान उड्डाणे रद्द करावी लागली व गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर सरकारने हस्तक्षेप केला व नियमांना स्थगिती दिली. संकट पूर्णपणे कधी निस्तरणार यासंदर्भात अजूनही संभ्रम आहे. १० डिसेंबरपर्यंत सेवा सुरळीत होण्याची शक्यता आहे. 

नागर‌ि विमान वाहतूक मंत्रालय विमान सेवा सुरळीत करण्यासाठी प्रयत्नरत आहे व अनेक उपाययोजना केल्या आहेत. विमान कंपन्यांवर विमान भाडे मर्यादा लादण्यात आली आहे व परतफेड प्रक्र‌िया जलद करण्याचे निर्देश दिले आहेत. मंत्रालयाने इंडिगोला अल्ट‌िमेटम दिल्यानंतर ६१० कोटी रुपयांची परतफेड करण्यात आली आहे व ३ हजार प्रवाशांना सामान वाटण्यात आले आहे. या संकटाची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे. 

हेही वाचा