प्रथम सरकारी कार्यालयांवर भर

पणजी : राज्यात येत्या डिसेंबर महिन्यापासून ‘स्मार्ट वीज मीटर’ बसवण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. या योजनेअंतर्गत गोव्यातील सुमारे ७.५ लाख वीज मीटर टप्प्याटप्प्याने बदलण्यात येणार आहेत. या मोहिमेची सुरुवात डिसेंबरमध्ये होईल, अशी माहिती राज्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली.
स्मार्ट मीटर बसवण्याचे कंत्राट सरकारने ‘डिजीस्मार्ट नेटवर्क’ या कंपनीला दिले आहे. केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत राज्याला मिळणाऱ्या निधीतून हे काम पूर्ण केले जाईल.
[Image of smart electric meter reading display]या प्रणालीमुळे कोणत्या उपकरणाला किती वीज लागते, हे समजणेही सोपे होईल. विशेष म्हणजे, ग्राहकांना त्यांचे वीज बिल थेट मोबाइलवर उपलब्ध होणार असल्याने प्रक्रियेत अधिक सुसूत्रता येईल.