सत्तरीमध्ये १४९ वन हक्क अर्जांपैकी ८० अर्ज मंजूर

विविध कारणांमुळे ६९ अर्ज नाकारण्यात आले

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
47 mins ago
सत्तरीमध्ये १४९ वन हक्क अर्जांपैकी ८० अर्ज मंजूर

पणजी : गोव्यातील (Goa) वन हक्क (Forest Right)  दाव्यांच्या अर्जांवर निर्णय घेणाऱ्या जिल्हा समितीने (District Committee)  सत्तरी जिल्ह्यातील (Sattari District) १४९ पैकी ८० अर्ज मंजूर केले. विविध कारणांमुळे ६९ अर्ज नाकारले गेले.

उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी अंकित यादव यांनी ही घोषणा केली.

वन हक्क दावे अर्ज (FRC) अंतिम करण्यासाठी जिल्हा समिती (DLC) आज बैठक झाली. माळोली, गोळावली, कोदाळ आणि देरोडे येथील अर्जांवर विचार करण्यात आला आणि निर्णय घेण्यात आला.

गोळावली येथील सहा, कोदाळ येथील १५ आणि देरोडे येथील ५८ अर्ज मंजूर करण्यात आले. कोदाळे  येथील १ अर्ज स्पष्टीकरणासाठी वन विभागाकडे पाठवण्यात आला आहे.

माळोली येथील ४० अर्ज दावेदारांनी स्वतः मागे घेतले. यामुळे त्यांना मान्यता मिळू शकली नाही. गोवा वन विकास महामंडळाच्या जागेवर २९ अर्ज लावण्यात आले होते. अर्ज फेटाळण्यात आले, असे जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी सांगितले.


हेही वाचा