साहसासोबत समर्पणाची भावना जोपासावी : राज्यपाल पुसापती

मडगाव : भारतीय सैन्याच्या सिग्नल कॉर्प्सच्या (Indian Armys Corps of Signals) ६१५ अग्निवीरांनी (Agniveers) लष्करी आणि तांत्रिक प्रशिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर नावेली (Navelim) येथील २ सिग्नल प्रशिक्षण केंद्र (2 STC) येथे पासिंग आऊट परेड झाली.

यावेळी राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू (Pusapati Ashok Gajapathi Raju) यांनी मार्गदर्श केले. साहसासोबत समर्पणाची भावना जोपासावी असे त्यांनी सांगितले.

नावेलीतील मिलीटरी कॅंप येथे ६१५ अग्निवीरांची पासिंग आऊट परेड पार पडली. राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी परेडचा आढावा घेतला. राज्यपाल म्हणाले की, अग्नीवीरांचे प्रशिक्षण पूर्ण झालेले असून, देशाची सेवा करण्यासाठी ते पूर्णपणे तयार झालेले आहेत.

देशासाठी प्राण अर्पण करण्याची तयारीही ठेवण्यात आली आहे. या मिलिटरी प्रशिक्षणातून सैनिक घडवण्यात आलेले नाहीत तर एक लिडर, रोल मॉडेल व खरे धैर्यवान बनवण्यात आले आहेत. यात नवी तंत्रे यासह तंत्रज्ञानाची ओळख व आत्मनिर्भर बनवण्यात आले आहे.
देशाच्या रक्षणासाठी सैनिकांनी प्राण अर्पण केलेले असून, ही परंपरा कायम राखण्यासाठी हिंमतीसह समर्पणाची भावना राखावी. प्रशिक्षित वॉरिअर्स असून ही एका नव्या प्रवासाची सुरूवात आहे.
शिस्त व उत्सुकता युनिफॉर्ममध्येही कायम राहावी. अग्निवीर केवळ देशाच्या सीमेवरील हल्ला रोखणारे सैनिक नाहीत तर टेक्नॉलॉजीत अग्रेसर असलेल्या भारताला नव्या स्थानावार अग्रेसर करण्यासाठी त्यांनी प्रयत्नशील रहावे.
ऑपरेशन सिंदूर हा केवळ देशाच्या सैनिकांच्या साहसाचे प्रतिक नसून, यात मॉर्डर्न टेक्नॉलॉजीचाही वापर करण्यात आलेला आहे. या लढ्याने भारतीय सैन्याची क्षमता दाखवून दिली आहे.
देश प्रगती करत आहे, नव्या दमाचे अग्निवीर आता सैन्यात सामील होणार आहेत. देश धाडसासह टेक्नोलॉजीतही पुढे जात असल्याचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी सांगितले.