डॉक्टर उमरने फरीदाबाद आणि आसपासच्या परिसरातून जमवल्या होत्या तब्बल ३२ जुन्या कार

नवी दिल्ली: लाल किल्ल्याजवळ १० नोव्हेंबर रोजी झालेल्या कार बॉम्बस्फोटामागे असलेल्या एका अत्यंत भयंकर आणि मोठ्या दहशतवादी कटाचा खुलासा गुप्तचर यंत्रणांनी केला आहे. दहशतवाद्यांनी तब्बल ३२ जुन्या गाड्यांमध्ये स्फोटके भरण्याची आणि बेगवेगळ्या ठिकाणी नेऊन त्यात स्फोट घडवण्याची योजना आखली होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात अयोध्या येथील राम मंदिराचा तसेच वाराणसीच्या अनेक मंदिरांचा समावेश होता.
पार्किंगमध्ये तीन तासांत बॉम्ब तयार
तपास यंत्रणांना मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार, जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी डॉ. उमर मोहम्मद याने सोमवारी दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी लाल किल्ल्याच्या पार्किंगमध्ये प्रवेश केला. तो सलग तीन तास (६ वाजून २२ मिनिटांपर्यंत) पार्किंगमध्येच i20 कारमध्ये बसून होता.
गुन्हे शाखेच्या सूत्रांनुसार, अल-फलाह विद्यापीठावर कारवाई झाल्याचे समोर आल्यानंतर उमर बॉम्ब बनवण्याचे साहित्य, जसे की अमोनियम नायट्रेट, फ्यूल ऑइल, टाइमर आणि डेटोनेटर घेऊन बाहेर पडला होता. जैशच्या हँडलरकडून प्रशिक्षण घेतलेल्या उमरला कमी वेळात बॉम्ब बनवण्यात प्राविण्य होते. त्यामुळे त्याने पार्किंगमधील एकांत जागा हेरून तिथे तीन तासांत बॉम्ब तयार केला, असा तपास यंत्रणांचा कयास आहे. स्फोट घडवण्यासाठी तो गर्दीची वाट पाहत होता.
३२ कारमध्ये स्फोट घडवण्याचा कट
तपासात उघड झाले आहे की, दहशतवादी अनेक ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट घडवण्याच्या मोठ्या योजनेत होते. बाबरी मशीद पतनाचे सूड घेण्यासाठी अयोध्या राम मंदिराला लक्ष्य करण्याची त्यांची योजना होती. यासाठी सुमारे आठ दहशतवादी चार ठिकाणी एकाच वेळी स्फोट घडवण्याची तयारी करत होते, ज्यासाठी त्यांना ३२ जुन्या कार वापरायच्या होत्या. आरोपी डॉक्टरांनी i20 आणि इकोस्पोर्ट या गाड्यांमध्ये बॉम्बसाठी फेरबदल (Modifications) करण्याचे काम सुरू केले होते.
फरीदाबादमधून जुन्या गाड्यांचा जुगाड
दहशतवाद्यांना या स्फोटांसाठी फरीदाबादमधून आठ जुन्या गाड्या गोळा करायच्या होत्या, त्यापैकी चार गाड्यांचा जुगाड त्यांनी केला होता. या चारही गाड्या पोलिसांनी आता जप्त केल्या आहेत:
दहशत आणि पकडले जाण्याची भीती
१० नोव्हेंबर रोजी उमर दिल्लीत प्रवेश करतानाचा आणखी एक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाला आहे. त्यात तो टोल नाक्यावर कॅमेऱ्यांकडे पाहत भीतीने मास्क लावून गाडी चालवताना दिसला. दुपारी २.३० वाजता तो बॉम्बने भरलेली कार घेऊन कनॉट प्लेसच्या आउटर सर्कलमध्ये होता. येथून संसद भवन फक्त तीन किलोमीटरवर आहे. त्याच्या या हालचालींवरून तो मोठा हल्ला करण्याच्या उद्देशाने दिल्लीतील गर्दीच्या भागांची रेकी करत होता, हे सिद्ध होते. एनआयए (NIA) आणि दिल्ली पोलीस आता या विशाल दहशतवादी नेटवर्कच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी कसून तपास करत आहेत.