गोवाः राज्यात चोवीस तासात सरासरी ४.१ मिलिमीटर पावसाची नोंद

राज्यात १ ऑक्टोबर ते ७ डिसेंबर दरम्यान सरासरी ३८८.९ मिमी पावसाची नोंद

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
07th December, 11:53 pm
गोवाः राज्यात चोवीस तासात सरासरी ४.१ मिलिमीटर पावसाची नोंद

पणजी : शनिवारी राज्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. हवामान खात्याने ८ ते १२ डिसेंबर दरम्यान राज्यातील वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवस राज्यातील कमाल तापमान ३२ ते ३४ अंश तर किमान तापमान २२ ते २४ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता खात्याने व्यक्त केली आहे. 

राज्यात चोवीस तासात सरासरी ४.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. म्हापसा येथे १७ मिमी, साखळीत १४.२, केपेत १३ मिमी , सांगेत १०.५ मिमी तर फोंड्यात १ मिमी पावसाची नोंद झाली. राज्यात १ ऑक्टोबर ते ७ डिसेंबर दरम्यान सरासरी ३८८.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. 

८ आणि ९ डिसेंबर रोजी वाऱ्याचा वेग ताशी ३५ ते ५५ किमी पर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांनी समुद्रात उतरू नये असे आवाहन खात्याने केले आहे. शनिवारी पणजीत कमाल ३३.२ अंश तर किमान २४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुरगाव येथील कमाल तापमान ३३.५ अंश तर किमान तापमान २५.३ अंश सेल्सिअस राहीले.                   

हेही वाचा