पणजी : मॉर्फ्ड व्हिडिओ प्रकरण : आमदाराचा 'तो' व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल, अनेक प्रश्न उपस्थित

संशयित कुकेशने घेतला जामीन अर्ज मागे; प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळण्याची शक्यता आहे.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
07th December, 03:27 pm
पणजी : मॉर्फ्ड  व्हिडिओ प्रकरण : आमदाराचा 'तो' व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल, अनेक प्रश्न उपस्थित

पणजी : उत्तर गोव्यातील 'त्या' आमदाराचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल झाल्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात  खळबळ माजली आहे. आरोपी पोलिसांच्या ताब्यात असतानाही व्हिडिओ जाहीर झाल्यामुळे सर्वच क्षेत्रातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याच मॉर्फ्ड व्हिडिओच्या आधारे आरोपी आपल्यास ब्लॅकमेल करत असल्याची आमदाराने तक्रार केली होती .

दरम्यान उत्तर गोव्यातील एका आमदाराचा मॉर्फ केलेला अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करून नाव बदनाम करण्याची धमकी देत लाखो रूपये उकळल्या प्रकरणी अटकेत असलेल्या संशयित कुकेश रावता याने जामीन अर्ज आज  मागे घेतला  आहे. प्रथम श्रेणी न्यायालयात दाखल केलेला जामिनासाठीचा अर्ज मागे घेतल्याने प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळण्याची शक्यता आहे.

आमदाराला धमकी देणाऱ्या ओडिशातील कुकेश रावता या २५ वर्षीय व्यक्तीला अटक करून गुन्हा शाखेने त्याचा मोबाईल फोन जप्त केला होता. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार कुकेशने ५ डिसेंबर २०२३ पूर्वी व्हिडिओ कॉल वरून सदर आमदाराशी संपर्क केला होता. हा व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करून त्याने एका महिलेबरोबर मॉर्फ करून अश्लील व्हिडीओ तयार केला. त्यानंतर हा व्हिडीओ सदर आमदाराला पाठवून व्हिडिओ व्हायरल करत  बदनामी करण्याची धमकी देत ५ कोटींची खंडणी मागितली. दरम्यान आमदाराने सुरुवातीला ५५ हजार व नंतर ५ लाख रुपये दिले होते. 


बातमी अपडेट होत आहे


हेही वाचा