यात कोणतीही फसवणूक किंवा प्रदूषण नाहीः मत्स्य विभाग
पणजी : मच्छीमारांनी लावलेल्या रापणीत भरतीचे पाणी भरल्यानेच मासे मरण पावले. या रापणीत मृत झालेले मासे मच्छिमारांनी करंजाळे समुद्रकिनारी तसेच टाकून दिले असून प्रदूषणामुळे एकही मासा मरण पावला नसल्याची माहिती मत्स्यव्यवसाय विभागाने दिली आहे.
मच्छीमार मासे पकडण्यासाठी समुद्रात जाळे टाकतात. ओहोटी असताना रापण काढली जाते. यावेळी रापणीमध्ये पाणी राहणार नाही याची खबरदारी घेऊन ते रापण काढतात. मात्र गुरूवारी मच्छीमारांना भरतीच्या काळात रापण काढण्यास सुरूवात केली.
या रापणीत पाणी भरले असल्याने पाण्यामुळे रापणीमध्येच मासे मरण पावले. हे मासे मच्छिमारांनी किनाऱ्यावर ओढून तसेच टाकल्याने माशाचे ढीग दिसून आले.
जलप्रदूषण किंवा अन्य कोणत्याही कारणाने मासे मेले नसल्याचे मत्स्यव्यवसाय विभागाने सांगितले. प्रदूषण नियंत्रण मंडळाला या घटनेची माहिती नाही. मृत्यूचे कारण शोधण्यासाठी मत्स्यव्यवसाय अधिकाऱ्यांनी मच्छिमारांकडे चौकशी केली. यात कोणतीही फसवणूक किंवा प्रदूषण नाही, असे मत्स्य विभागाचे संचालक अश्विन चंद्रू यांनी सांगितले.