म्हापसा : फेअरा बाईक्सा, म्हापसा येथील ओम चेबर्स इमारती मधील रिलायबल प्रिन्टर्स या दुकानाला शार्ट सर्कीटमुळे आग लागली. यात दुकानातील संगणकसह इतर उपकरणे जळाल्याने ५ लाखांचे नुकसान झाले आहे. ही घटना गुरूवारी पहाटे २ च्या सुमारास घडली. शॉर्ट सर्कीट होऊन दुकानाच्या दर्शनी कॅबिनमध्ये सर्वप्रथम आग लागली. एसी, लॅपटॉप, प्रिन्टर, टीव्ही स्क्रीन, सीसीटीव्ही कॅमेरा, टेबल, खुर्ची व इतर विद्युत्त उपकरणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
सुदैवाने ही आग दुकानाचा पोटमाळा तसेच आतील कॅबीनमध्ये पसरली नसल्याने मोठी हानी टळली. या दुर्घटनेत अंदाजे ५ लाखांचे नुकसान झाल्याची माहिती दुकान मालक निलेश सांगोडकर यांनी दिली. घटनेच्यावेळी मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे दुकानाला आग लागल्याचा अंदाज इमारतीमधील कुणालाही आला नाही. वीज कर्मचार्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.