एसबीआयच्या डेबिट कार्डवरील मेंटेनन्स चार्ज १ एप्रिलपासून वाढणार

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
28th March, 04:12 pm
एसबीआयच्या डेबिट कार्डवरील मेंटेनन्स चार्ज १ एप्रिलपासून वाढणार

नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) ग्राहकांसाठी चिंता वाढवणारी बातमी आहे. बँकेने काही डेबिट कार्डधारकांच्या वार्षिक देखभाल शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हे बदल १ एप्रिलपासून लागू होतील. या कार्ड्सच्या देखभाल शुल्कात ७५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. हा बदल सर्व कार्डसाठी केलेला नाही.SBI Classic, Platinum other debit card users: These are the annual charges  you have to pay | Zee Business

एसबीआयचे ४५ कोटींहून अधिक ग्राहक आहेत.

एसबीआयने डेबिट कार्डशी संबंधित इतर शुल्काबाबतही आपली रूपरेषा तयार केली आहे. डेबिट कार्ड बदलणे, डुप्लिकेट पिन आणि आंतरराष्ट्रीय व्यवहार यासारख्या सुविधांसाठीही बँकेला पैसे द्यावे लागतात. एसबीआय अनेक प्रकारचे कार्ड जारी करते. प्रत्येक कार्डचे मेंटेनन्स चार्ज हे वेगवेगळे असतात. मेंटेनन्स चार्जवर जीएसटी अतिरिक्त आकरले जातेSBI ATM Card Rules: Check Out Daily ATM Cash Withdrawal Limit For All Debit  Cards

प्रत्येक कार्डच्या मेंटेनन्स चार्जवर स्वतंत्रपणे जीएसटी आकारला जाईल. जर कार्डचे मेंटेनन्स चार्ज १२५ रुपये असेल तर त्यात जीएसटी जोडला जाईल. पूर्वी क्लासिक-सिल्व्हर-ग्लोबल-कॉन्टाक्लास डेबिट कार्डसाठी १२५ रुपये लागत होते, आता त्याची किंमत २०० रुपये असेल. युवा-गोल्ड-कॉम्बो डेबिट कार्ड-माय कार्डसाठी, तुम्हाला १७५ रुपये नव्हे तर २५० रुपये द्यावे लागतील. प्लॅटिनम डेबिट कार्डसाठी, तुम्हाला २५० रुपये नव्हे तर ३२५ रुपये द्यावे लागतील. प्राइड-प्लॅटिनम बिझनेस डेबिट कार्डसाठी, तुम्हाला ३५० रुपयांऐवजी ४२५ रुपये द्यावे लागतील. आणखी एक महत्त्वाची माहिती अशी की १ एप्रिल २०२४ पासून, काही क्रेडिट कार्डावर सध्या उपलब्ध असलेले रिवॉर्ड पॉइंट्स मिळणार नाहीत.SBI launch new series of RuPay Platinum/Select debit cards + Offers |  DesiDime

इतर शुल्क

डेबिट कार्ड बदलण्यासाठी, ३०० रुपये अधिक जिएसटी भरावा लागेल. डुप्लिकेट पिन किंवा पिन तयार करण्यासाठी, ५० रुपये अधिक जीएसटी भरावा लागेल. आंतरराष्ट्रीय व्यवहारासारख्या सेवांसाठीही वेगळे शुल्क आकारले जाते. आंतरराष्ट्रीय व्यवहारातील शिल्लक तपासण्यासाठी २५ रुपये लागतात. एटीएममधून पैसे काढण्यावर किमान १०० रुपये आणि ३.५ रुपये जीएसटी आकारला जातो. पॉइंट ऑफ सेल (PoS) किंवा ई-कॉमर्स सेवेचा वापर केल्यास जीएसटी सोबत ३ टक्के ट्रांजेक्शन अमाऊंट लागेल. या सर्व व्यवहारांवर १८ टक्के दराने जीएसटी आकारला जाईल.     How Many Types Of Sbi Credit Cards Are There        

हेही वाचा