माचोमॅन विद्युतकडे ४३ कोटींची संपत्ती


25th May 2023, 09:58 pm
माचोमॅन विद्युतकडे ४३ कोटींची संपत्ती

विद्युत जामवालचा जन्म १० डिसेंबर १९८० रोजी जम्मू आणि काश्मीर येथे झाला. ताे इंडियन फिल्म इन्स्टिट्युटचा माजी विद्यार्थी आहे. त्याने २०११ मध्ये अॅक्शन ड्रामा ‘फोर्स’द्वारे बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केले. त्यानंतर त्याने कमांडो आणि कमांडो २ सह इतर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. आज त्याने आपल्या मेहनतीच्या जोरावर सिनेसृष्टीत नाव कमावले असून तो कोट्यवधी रुपयांचा मालकही आाहे.
प्रसिद्ध अभिनेता विद्युत जामवालने मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेतले आहे आणि तो अनेकदा त्याच्या चित्रपटांमध्ये दमदार स्टंट करताना दिसतो. इतकेच नाही तर चित्रपटांमध्ये धोकादायक स्टंटसाठीही विद्युत कधीही बॉडी डबल वापरत नाही. त्याचे सर्व अॅक्शन सीन तो स्वतः शूट करतो. काही काळापूर्वी तो जगातील १० लोकांच्या यादीत समाविष्ट झाला आहे (यू डोन्ट वॉन्ट टू मेस विथ) ज्यांना कोणीही टक्कर देऊ इच्छित नाही. द रिचेस्टने जाहीर केलेल्या या यादीत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि मॅन व्हर्सेस वाइल्ड फेम बेअर ग्रिल्स यांचाही समावेश आहे.
विद्युत जामवालने वयाच्या तिसऱ्या वर्षी मार्शल आर्ट शिकण्यास सुरुवात केली. विद्युत हा मार्शल आर्ट्समध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पात्र आहे. त्याच्या फिटनेस आणि मस्क्युलर बॉडीमुळे त्याचा देश-विदेशात मोठा चाहतावर्ग आहे. विद्युतने आतापर्यंत २५ हून अधिक देशांमध्ये अनेक लाइव्ह अॅक्शन शो केले आहेत.
विद्युत जामवाल यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण केरळमधील पलक्कड आश्रमातून केले. त्यानंतर पुढील शिक्षण आर्मी पब्लिक स्कूल (हिमाचल प्रदेश) येथे वडिलांच्या हिमाचल प्रदेशात पोस्टिंग असताना पूर्ण केले. त्यानंतर अभिनेत्याने मार्शल आर्ट्समध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले.
अलीकडेच त्याने फॅशन डिझायनर नंदिता मेहतानीसोबत एंगेजमेंट केले. त्याने १ सप्टेंबर २०२१ रोजी कमांडो स्टाईलमध्ये नंदितासोबत एंगेजमेंट केली. विद्युत जामवालने सोशल मीडियावर दोन फोटो शेअर केले होते, ज्यात पहिल्या फोटोत दोन्ही कमांडो ट्रेनिंग करताना दिसत होते, तर दुसऱ्या फोटोत कपल ताजमहालकडे बघत होते. विद्युतने सोशल मीडियावर फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मी कमांडो स्टाईलमध्ये लग्न करत आहे.
एकूण मालमत्ता
अभिनेता विद्युत जामवालची एकूण संपत्ती भारतीय रुपयांमध्ये ४३ कोटी आहे. प्रत्येक चित्रपटात अभिनयासाठी तो ३ कोटी ते ४ कोटी रुपये घेतो. विद्युत जामवाल ब्रँड एंडोर्समेंटसाठी रु. ३५-४० लाखांपर्यंत शुल्क आकारतो. विद्युत जामवालच्या वार्षिक उत्पन्नाबद्दल बोलायचे झाले तर त्याचे वार्षिक उत्पन्न ७ कोटी रुपये आहे.