रजनीकांतसोबत फोटोमुळे प्रभास झाला ‘ट्रोल’


16th March 2023, 11:35 pm
रजनीकांतसोबत फोटोमुळे प्रभास झाला ‘ट्रोल’

‘सालार’ अभिनेता प्रभासचे दोन मोठे चित्रपट २०२३ मध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज आहेत. ‘बाहुबली’ नंतर प्रभासचा एकही चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. आता हे वर्ष त्याच्यासाठी सर्वोत्तम ठरेल अशी अपेक्षा आहे. दरम्यान, त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यासाठी त्याला चांगलेच ट्रोल केले जात आहे. फोटोमध्ये त्याच्यासोबत रजनीकांत आणि शिवा राज कुमारही दिसत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या प्रभासच्या लेटेस्ट फोटोमध्ये तो खूपच लठ्ठ दिसत आहे. वास्तविक हा अभिनेत्याचा मॉर्फ केलेला फोटो आहे जो कोणीतरी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. लोक प्रभासच्या या फोटोची खिल्ली उडवत आहेत. एका यूजरने फोटो शेअर करत लिहिले की, 'प्रभासला काय झाले, तो खूप वाईट दिसत आहे.' त्याचवेळी काही यूजर्स त्याला काका म्हटले आहे.
खरं तर, व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये प्रभास नसून रजनीकांत आणि शिवा कुमारसोबत कोणीतरी दुसरीच व्यक्ती आहे. हा मंगळुरूचा फोटो आहे ज्यावर प्रभासचा चेहरा चिकटवण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी प्रभास त्याच्या वाढलेल्या वजनामुळे चर्चेत आला होता. त्याच्या वजनामुळे त्याला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात होते. बरे आता त्याचे वजन कमी झाल आहे. 'सालार' आणि 'आदिरपुरुष' या चित्रपटांमध्ये तो पूर्णपणे फिट दिसणार आहे.
प्रभास शेवटचा 'राधे श्याम' चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याची पूजा हेगडेसोबतची जोडी पाहायला मिळाली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. अलीकडेच प्रभासला त्याचा 'सालार' हा चित्रपट 'आदिपुरुष'पूर्वी प्रदर्शित करायचा आहे अशी बातमी आली होती.