पश्चिम विभागीय खेलो इंडिया महिला ज्युदो लीग आजपासून

|
30th January 2023, 10:19 Hrs
पश्चिम विभागीय खेलो इंडिया  महिला ज्युदो लीग आजपासून

प्रतिनिधी। गोवन वार्ता

पणजी : गोवा ज्युदो असोसिएशन ३१ जानेवारी ते ४ फेब्रुवारी दरम्यान स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ गोवा इनडोअर स्टेडियम, कांपाल येथे प​श्चिम विभाग खेलो इंडिया महिला लीग/रँकिंग ज्युदो स्पर्धेची दुसरी आवृत्ती आयोजित करत आहे.

गोव्यासह सात राज्यांतील ६५० हून अधिक स्पर्धक यात सहभागी होणार आहेत. यात महाराष्ट्र, राजस्थान, दमण आणि दीव, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि गुजरात पाच दिवसांच्या कालावधीत स्पर्धा करताना दिसतील.

३६व्या राष्ट्रीय खेळ गुजरातमध्ये कांस्यपदक जिंकणारा आंतरराष्ट्रीय ज्युदोपटू अपूर्वा पाटील झोनल चॅम्पियनशिपमधील स्टार आकर्षणांपैकी एक असेल जिथे सब-ज्युनियर, कॅडेट्स, ज्युनियर आणि वरिष्ठ विभागात विविध वजन गटांमध्ये स्पर्धा आयोजित केल्या जातील.

गोवा ज्युदो असोसिएशनचे अध्यक्ष गुरुदत्त भक्ता आणि स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाचे ज्युदो प्रशिक्षक सुशील गायकवाड यांनी सोमवारी संध्याकाळी प्रसारमाध्यमांना माहिती देताना पश्चिम विभागीय खेलो इंडिया महिला लीग/रँकिंग ज्युदो स्पर्धेतील प्रमुख घटकांवर प्रकाश टाकला.

प्रत्येक श्रेणीतील पदक विजेते भोपाळ येथे १२ - १५ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय महिला लीग चॅम्पियनशिपसाठी पात्र होतील, असे सुशील गायकवाड यांनी सांगितले. महाराष्ट्राने २०४ ज्युदोपटूंसह सर्वात मोठा संघ मैदानात उतरवला आहे. स्पर्धेवेळी तांत्रिक अधिकारी अनुभवी आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहेत, असेही गायकवाड म्हणाले.

स्पर्धेचे उद्घाटन १ फेब्रुवारी रोजी क्रीडा सचिव अजित रॉय यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. प्रत्येक दिवसाच्या शेवटी संध्याकाळी ५ वाजता पदके प्रदान केली जातील. सर्व समर्थनासाठी गोवा प्राधिकरण आणि सर्व मदतीबद्दल गायकवाड व भक्ता यांनी खेलो इंडिया गोवा केंद्राचे प्रमुख सुमित सेन यांचे आभार मानले.

१५० ज्युदोपटू गोव्याचे प्रतिनिधित्व करतील, असे भक्ता यांनी सांगितले. इतर राज्यांचा सहभाग पाहता, आमच्या ज्युदोपटूंनाही प्रोत्साहन मिळत आहे. आमच्या मुलींमध्ये या उत्साहामुळे, गोव्यातील ज्युदो केंद्रांना चालना मिळेल, असे आम्हाला वाटते, असे ते म्हणाले.