‘अवतार २’ने भारतात मोडले कमाईचे विक्रम


05th January 2023, 10:38 pm
‘अवतार २’ने भारतात मोडले कमाईचे विक्रम
  1. कांतारा चित्रपटाला टाकले मागे : जागतिक बाजारपेठेतही जादू कायम
    जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या 'अवतार' या चित्रपटाचा सिक्वेल 'अवतार २ : द वे ऑफ वॉटर' बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. १६ डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला जेम्स कॅमेरॉनचा 'अवतार २' हा चित्रपट वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिसवर २०२२ चा सर्वात मोठा चित्रपट ठरणार आहे. भारतातही या चित्रपटाची खूप क्रेझ आहे आणि वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात भारतात एक मोठा चित्रपट प्रदर्शित झाल्याचा फायदा 'अवतार २' ला मिळाला आहे.
    पहिल्याच दिवशी ४० कोटींची कमाई करून दमदार सुरुवात करणाऱ्या 'अवतार २'ने तिसऱ्या आठवड्यातही चांगली कमाई केली आहे. वीकेंडमध्ये त्याचे कलेक्शन मजबूत होते, परंतु आठवड्याच्या कामकाजाच्या दिवशीही या चित्रपटाला भारतीय बॉक्स ऑफिसवर भरपूर प्रेक्षक मिळत आहेत. 'अवतार २' ने दमदार कमाई करत काही नवे रेकॉर्ड केले आहेत.
    बुधवारचे कलेक्शन
    बॉक्स ऑफिसवर आलेल्या 'अवतार २'चे सुरुवातीचे रिपोर्ट्स सांगत आहेत की या चित्रपटाने आतापर्यंत जोरदार कमाई केली आहे. मंगळवारपर्यंत ३४५.९ कोटींहून अधिक कमाई करणाऱ्या 'अवतार २' ने बुधवारी ४ कोटींहून अधिक कमाई केली. यासह भारतात 'अवतार २' च्या एकूण कमाईने ३५० कोटींचा आकडा पार केला आहे.
    'कांतारा' टाकले मागे
    मागील वर्ष नुकतेच संपले आणि त्यात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांबद्दल बोलायचे तर यशचा केजीएफ २ हा सर्वात मोठा चित्रपट होता. २०२२ मध्ये भारतीय बॉक्स ऑफिसवर तिसरा सर्वात मोठा चित्रपट असलेल्या 'कांतारा'चे कलेक्शन सुमारे ३४५ कोटी रुपये होते. आता 'अवतार २' ने या कमाईला मागे टाकले आहे आणि २०२२ चा तिसरा मोठा चित्रपट ठरला आहे.
    भारतीय बॉक्स ऑफिसवरचे टॉप ५ चित्रपट
    १) केजीएफ २ : ९५० कोटींहून अधिक
    २) आरआरआर : ९०० कोटींहून अधिक
    ३) अवतार २ : ३५० कोटींहून अधिक
    ४) कांतारा : ३४५ कोटींहून अधिक
    ५) ब्रह्मास्त्र भाग १ : २६९ कोटींहून अधिक
    बॉलिवूडचा टॉप रेकॉर्ड धोक्यात
    बॉक्स ऑफिसच्या बाबतीत, भारतातील पाच मोठ्या फिल्म इंडस्ट्रीजपैकी फक्त मल्याळम इंडस्ट्री अशी आहे, ज्यांचे टॉप कलेक्शन भारतातील हॉलीवूड चित्रपटांच्या मागे आहे. हिंदी, तेलगू, तामिळ आणि कन्नड चित्रपट अजूनही भारतात हॉलीवूड चित्रपटांपेक्षा वरचढ आहेत. पण आता बॉलिवूडच्या टॉप रेकॉर्डवर एक धोका आहे की ते हॉलिवूडच्या 'अवतार २' च्या मागे पडण्याची शक्यता आहे.
    आमिर खानचा 'दंगल' हा हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. २०१६ मध्ये आलेल्या या चित्रपटाने भारतात ३८७ कोटी रुपयांपेक्षा थोडी जास्त कमाई केली होती. 'अवतार २' ज्या वेगाने कमाई करत आहे, ते पाहता हा आकडाही दूर नाही.
    बॉलिवूडचा पुढचा मोठा रिलीज, शाहरुख खानचा 'पठाण' अजून २० दिवस बाकी आहे. 'अवतार २' इतके दिवस अशीच कमाई करत राहिल्यास टॉप कलेक्शनच्या बाबतीत बॉलीवूडचा विक्रम हॉलिवूडला मागे टाकेल, तोही फक्त भारतातच.
    आत्तापर्यंत भारतातील सर्वात मोठा हॉलीवूड चित्रपट 'अ‍ॅव्हेंजर्स: एंडगेम' आहे ज्याने येथील बॉक्स ऑफिसवर ३७३ कोटी रुपयांची कमाई केली आहे. पण आता 'अवतार २' हा विक्रम मोडून भारतातील टॉप हॉलिवूड चित्रपट ठरेल, असे मानले जात आहे.