कथेसोबत कोकणची सैर घडविणारा ‘थ्री ऑफ अस’

कलाकारांनी साधला माध्यम प्रतिनिधींशी संवाद

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
25th November 2022, 12:07 am
कथेसोबत कोकणची सैर घडविणारा ‘थ्री ऑफ अस’

प्रतिनिधी : ‘थ्री ऑफ अस’ आजच्या काळाशी जोडणारा सिनेमा आहे. कथेसोबत तुम्हाला कोकणची सैर घडवून आणणारा हा सिनेमा पाहताना यातील प्रत्येक भूमिका तुम्हाला आपलीशी वाटणार आहे, असे प्रतिपादन सिनेमाचे दिग्दर्शक अविनाश अरुण यांनी केले. माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना ते बोलत होते.

गोव्याच्या शेजारी असणाऱ्या कोकणातील वेंगुर्ला या भागात सिनेमाचे चित्रिकरण झाले आहे. या भागात चित्रिकरण करण्याचा अनुभव नेहमीच आनंददायी असतो, असे अभिनेत्री शेफाली शहा यावेळी म्हणाल्या.

अभिनेता जयदीप अहलावत यांनी बोलताना अविनाश यांच्यासोबत शिकत होतो, तेव्हापासून आमच्यातील बंध चांगला आहे. त्यामुळे या सिनेमात त्यांच्यासोबत काम करताना खूप मजा आली. माझी भूमिका ही खूप आव्हानात्मक होती मात्र ती खूप सरलतेने करता आली, असे ते म्हणाले.

साडेचार वर्षांनी पुन्हा काम करते आहे. जयदीपच्या बायकोची भूमिका मी साकारली आहे. आमचे नाते बघून खूप जळायला होईल इतके छान नाते दाखविण्यात आले आहे. तुम्ही प्रत्यक्ष चित्रपट बघा तुम्हाला तो नक्की आवडेल, असे कादंबरी कदम यांनी म्हटले. मला वाटले नव्हते इतकी चांगली व जास्त वेळ चालणारी भूमिका मिळेल. पण अविनाशने जेव्हा सांगितले मला शेफालीच्या नवऱ्याची भूमिका करायची आहे तेव्हा मी ती लगेच स्वीकारली. यामध्ये एका बेसूर गाणाऱ्या व्यक्तिमत्वाची भूमिका साकारतो आहे. बेसुरा स्वानंद बघायला तुम्हाला नक्की आवडेल, असे ते म्हणाले.