केरी-घोटेली येथील पोर्तुगीजकालीन पूल कोसळला

|
14th August 2022, 11:35 Hrs
केरी-घोटेली येथील पोर्तुगीजकालीन पूल कोसळला

केरी सत्तरी येथील कोसळलेला पोर्तुगीजकालीन पूल.

प्रतिनिधी। गोवन वार्ता
वाळपई :
केरी पंचायत क्षेत्रातील विनावापर असलेला पोर्तुगीजकालीन पूल रविवारी अखेर कोसळला. सदर पूल धोकादायक बनला होता. त्यामुळे त्याचठिकाणी नवीन पुलाची संकल्पना राबविण्यात आली होती‌. दरम्यान, पोर्तुगीज काळात घोटेली क्रमांक २ मध्ये पुलाची उभारणी करण्यात आली होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून सदर पूल कमकुवत बनला होता.
सदर पुलाची धोकादायक अवस्था पाहून सरकारने त्याच्या शेजारी नवीन पूल बांधला होता. यामुळे काही वर्षांपासून या पुलाचा वापर करण्यात येत नव्हता. रविवारी सदर पूल कोसळला. दरम्यान, यासंदर्भात कुणालाही नुकसान झालेले नाही. मात्र, पोर्तुगीज काळातील पूल कोसळल्यामुळे पोर्तुगीज काळातील या भागातील अस्तित्व नष्ट झाले आहे.
या संदर्भात मिळालेल्या अधिक माहितीनुसार सदर पोर्तुगीजकालीन पूल पाडण्यात यावा, अशी येथील नागरिकांनी मागणी केली होती‌. मात्र सदर मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आला होता. शेवटी सदर पूल कोसळला असून यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. गेल्या काही वर्षांपासून या पुलाचा वापर होत नव्हता. तरीसुद्ध काही दारूडे या पुलाचा वापर दारू पिण्यासाठी करीत होते. त्यामुळे सदर ठिकाणी धोकादायक घटना घडण्याची शक्यता नाकारता येण्यासारखी नव्हती. मात्र, सदर पूल कोसळल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, कोसळलेल्या पुलाचा उर्वरित भाग पाडण्यात यावा, अशी मागणी करत सार्वजनिक बांधकाम खात्याने याची दखल घ्यावी, असे आवाहन केले आहे.