कळसई-दाभाळ येथे दोन घरांवर फांदी पडून नुकसान


10th August 2022, 12:21 am
कळसई-दाभाळ येथे दोन घरांवर फांदी पडून नुकसान

कळसई दाभाळ येथील घरावर फांदी पडून झालेले नुकसान.


धारबांदोडा : कळसई-दाभाळ येथील दोन घरांवर फणसाची फांदी पडून सुमारे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सदर घटना मंगळवारी मध्यरात्री सुमारे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली.
शांताबाई शांताराम गावकर हिच्या घराच्या मागील खोलीवर फांदी पडून सुमारे वीस हजारांचे नुकसान झाले असून शेजारी राहणाऱ्या सुशांती गावकर यांच्याही घरावर फांदी पडून अंदाजे २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. शांताबाई गावकर या अत्यंत गरीब असून ती आपल्या घरात एकटीच राहत आहे. तिच्या स्वयंपाक खोलीवर सदर फांद्या पडून मोठे नुकसान झाले आहे. कुडचडे येथील अग्निशमन दलाच्या साहाय्याने दोन्ही घरांवरील फांद्या हटविण्यात आल्या आहेत.