कमलेश्वर विद्यालयाचे बारावी परीक्षेत यश

विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम


21st May 2022, 11:50 pm
कमलेश्वर विद्यालयाचे बारावी परीक्षेत यश

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पेडणे :
नुकत्याच जाहीर झालेल्या गोवा बोर्डाच्या १२ वी परीक्षेत कोरगाव येथील श्री कमलेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयाचा कला आणि वाणिज्य या दोन्ही शाखांचा १०० टक्के निकाल लागला. या विद्यालयातून ८८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.
कला शाखेतील ५०पैकी विशेष प्रविण्य श्रेणीत ६, प्रथम वर्ग २४, द्वितीय २०, कला शाखेत हर्षदा पांडुरंग तळावणेकर ८६.६६ टक्के गुण मिळवून प्रथम आली. आयुषा सदानंद वेताळकर ८५.८३ टक्के द्वितीय, तर काजल किशोर म्हालदार ७८ टक्के गुण मिळवून तृतीय आली.
वाणिज्य शाखेतील ३८ विद्यार्थ्यांपैकी ८ जण विशेष प्रविण्य श्रेणी, १७ प्रथम श्रेणी, १२ द्वितीय, तर ०१ उत्तीर्ण श्रेणीत पास झाला. वाणिज्य शाखेत स्टेला मेन्डोसा ८८.६६ टक्के प्रथम, सिद्धी सखाराम वेंगुर्लेकर ८३ टक्के द्वितीय तर निखिल दीपक गडेकर ८२.३३ टक्के गुण मिळवून तृतीय आला.
विद्यालयाने आपली शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखल्याबद्दल श्री कमळेश्वर शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन परशुराम गावडे, अध्यक्ष धर्मा शेट्ये, सचिव नीळकंठ थळी, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष विजय तुळसकर यांनी प्राचार्य जुही थळी, शिक्षक शिक्षकेतर, कर्मचारी विद्यार्थी यांचे अभिनंदन केले आहे.                  

हेही वाचा