नारळ गुळ शेवया

Story: स्वप्ना नाईक | अन्नपूर्णा |
20th May 2022, 10:14 Hrs
नारळ गुळ शेवया

एक परिपूर्ण चहाच्या वेळेची भूक भागवणारी डिश. करायला सोप्पी आणि अगदी कमी घटक वापरुन बनवता येणारी कुकीज आणि कप केकपेक्षा थोडा आरोग्यदायी पर्याय…परफेक्ट नॉन-स्टिकी शेवया.

साहित्य:

कप गव्हाच्या पीठाच्या शेवया, कप उकळलेले गरम पाणी, वाटी गूळ, ड्रायफ्रुट्स ऐच्छिक, लवंगा, वेलच्या, १/४ कप ताजे खोबरे, टीस्पून शुद्ध तूप, 

कृती:

तूप गरम करून शेवया हलक्या तपकिरी रंगावर त्यात भाजून घ्या. तसेच त्यात ड्रायफ्रुट्स, लवंगा, वेलची आणखी एक मिनिट भाजून घ्या.

त्यात उकळते पाणी घालून सतत मंद आचेवर ढवळत रहा.

आता खोबरं घाला आणि शेवयातले पाणी शोषले जाईपर्यंत शिजवा.

यात गुळ मिसळा आणि पुन्हा शिजवा.

चविष्ट व करण्यास झटपट अशा शेवया तयार!

गव्हाच्या पिठाच्या शेवयांचा वापर केल्याने जास्त काळ पोट भरलेले राहील, ताजे नारळ घातल्यास त्याला जास्त मलईदार चव येईल. अशी ही तुमच्या मुलांसाठी किंवा ट्यूटोरियल क्लासनंतर एक परिपूर्ण टिफिन रेसिपी जरूर बनवून पहा.