मौनी रॉय करणार गोव्यात लग्न

|
13th January 2022, 10:46 Hrs
मौनी रॉय करणार गोव्यात लग्न

टीव्ही ते बॉलिवूड फिल्म इंडस्ट्री असा प्रवास करणारी सुंदर अभिनेत्री मौनी रॉय लवकरच नवरी होणार आहे. ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत सात फेरे घेणार आहे, तेही याच जानेवारीत. लग्नासाठी दोघांनी गोव्यात हॉटेलही बुक केले आहे.
२०२२ मध्ये अनेक बॉलिवूड स्टार्सच्या लग्नाची लोक वाट पाहत आहेत. याची सुरुवात मौनी रॉयच्या लग्नापासून होणार आहे. अभिनेत्री मौनी रॉय येत्या २७ जानेवारीला तिचा बिझनेसमन बॉयफ्रेंड सूरज नांबियारसोबत ७ फेरे घेणार आहे. हे लग्न गोव्यातील एका ५ स्टार हॉटेलमध्ये होणार आहे.
अभिनेत्री मौनी रॉयचा भावी पती सूरज दुबईत राहतो. तो एक इन्व्हेस्टमेंट बँकर आहे. सूरज मूळत भारतातच राहणारा आहे. काही काळापूर्वी मौनी आणि सूरज यांची भेट झाली, त्यानंतर त्यांच्यात डेटिंगची प्रक्रिया सुरू झाली. बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

साऊथ चित्रपट अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांनीही गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग केले होते. त्यांचे लग्न एखाद्या परीकथेपेक्षा कमी नव्हते. मात्र, आता हे कपल वेगळे झाले आहे. टीव्ही जगतातील पॉवर कपल सान्या इराणी आणि मोहित सहगल यांनीही गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग केले होते.
अभिनेत्री सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेन आणि चारू असोपा यांनीही गोव्यात सात फेऱ्या घेत विवाह केला होता. या दोन्ही स्टार्सने हिंदू आणि ख्रिश्चन रितीरिवाजानुसार लग्न केले. कॉमेडी स्टार भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांचेही गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग झाले होते. अतिशय भव्यदिव्य पातळीवर त्यांचे लग्न झाले.
टीव्ही मालिका अभिनेत्री अनिता हसनंदानी आणि रोहित रेड्डी हे देखील इंडस्ट्रीतील पॉवर कपल आहेत. या दोघांनी २०१३ मध्ये गोव्यात लग्न केले होते. टीव्ही सिरियल स्टार्स विशाल वशिष्ठ आणि दीपाक्षी यांनीही गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग केले होते. या दोन स्टार्सच्या लग्नाची खूप चर्चा झाली होती.