बस्तोडा अपघातातील जखमी वृद्ध पायलटचे गोमेकॉत निधन


03rd April 2021, 11:44 pm
प्रतिनिधी । गोवन वार्ताम्हापसा : बस्तोडा येथे तार पुलाजवळ राष्ट्रीय महामार्गावर कारची मोटारसायकलला धडक बसल्याने पायलट ज्ञानेश्वर दिवकर (७५, रा. खोब्रावाडा कळंगुट) यांचे निधन झाले. या प्रकरणी म्हापसा पोलिसांनी कारचालक संशयित कुशल नाटेकर (३१, रा. पुनोळा उसकई) याच्या विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात शुक्रवारी दि. २ रोजी सकाळी ११.३० वा. घडला होता.संशयित जीए ०३ आर ६८०० या क्रमांकाच्या कारने बस्तोडामार्गे सर्व्हिस रस्त्यावरून महामार्गावरून कोलवाळच्या दिशेने जात होता. तार बस्तोडाजवळ पोहोचताच विरुद्ध दिशेने येणार्‍या जीए ०३ के २२३४ क्रमांकाच्या पायलट मोटरसायकला कारने धडक दिली. यात पायलट ज्ञानेश्वर दिवकर हे गंभीर जखमी झाले. त्यांना लगेच गोमेकॉत उपचारार्थ दाखल करण्यात आले. पण शनिवारी सकाळी उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले. पोलिसांनी संशयिताविरोधात भादंसंच्या कलम २७९, ३०४ (अ) नुसार सदोषवधाचा गुन्हा नोंदविला आहे. अपघाताचा पंचनामा हवालदार उल्हास गावकर यांनी केला. पुढील तपास उपनिरीक्षक रूपाली गोवेकर करत आहेत.