आयपीएलचे १२० देशांमध्ये लाईव्ह टेलिकास्ट


15th September 2020, 05:42 pm


- हिंदी-इंग्रजीसह सहा स्थानिक भाषेत समालोचन
- पाकिस्तानमध्ये लाइव्ह प्रसारण नाही

अबुधाबी : जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग आयपीएलचे १३वे सीजन दुबईमध्ये १९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. टुर्नामेंटचे लाइव्ह टेलिकास्ट १२० देशांमध्ये केले जात आहे. भारतात स्टार इंडियाकडे टुर्नामेंटच्या प्रसारणाचे अधिकार आहेत. भारतात हिंदी आणि इंग्रजीशिवाय तमिळ, तेलुगू, कन्नड, बांग्ला, मल्याळम आणि मराठी भाषेत समालोचन होणार आहे.
टीव्हीवरील चॅनेलसोबतच प्रेक्षकांना हॉटस्टारवर मॅचची लाइव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल. परंतु, यासाठी यूजर्सला प्रीमियम मेंबरशिप घेणे गरजेचे असेल. यूके-आयरलँडमध्ये स्काय स्पोर्ट्स, अमेरिका-कॅनडामध्ये विलो टीव्ही तर ऑस्ट्रेलिया-न्यूजीलँडमध्ये फॉक्स स्पोर्ट्सवर मॅच पाहता येतील. दरम्यान, पाकिस्तानमध्ये टुर्नामेंटचे लाइव्ह प्रसारण होणार नाही. याशिवाय अफगाणिस्तान आणि बांग्लादेशमधील प्रसारणासाठी स्टार स्थानिक ब्रॉडकास्टर्ससोबत चर्चा करत आहे.
आयपीएल २०२० साठीच्या‍ समालोचकांच्या पॅनलमध्ये बऱ्याच दिग्गज खेळाडूंच्या नावाचा समावेश आहे. इंग्रजी समालोचकांच्या यादीत सुनील गावस्कर, हर्षा भोगले, कुमार संगकारा, इयान बिशप, केवीन पीटरसन यांसोबतच इतरही काही प्रसिद्ध नावाचा समावेश आहे. त्याशिवाय या यादीत लीसा स्थालेकर आणि अंजुम चोप्रा या महिला समालोचकाच्या नावाचाही समावेश आहे.
इंग्रजीव्यतिरिक्त हिंदी समालोचकाच्या पॅनलमध्ये आकाश चोप्रा, इरफान पठाण, आशिष नेहरा, संजय बांगर आणि यांच्यासह इतरही समालोचकांचा समावेश आहे. तर, भारतीय क्रिकेट टीमच्या निवड समितीमध्ये काम केलेले श्रीकांत हे तामिश आणि एम.एस.के. प्रसाद हे तेलुगूमध्ये समालोचन करताना दिसतील.
समालोचकांची यादी
हिंदी समालोचक : आकाश चोप्रा, इरफान पठान, आशिष नेहरा, जतिन सप्रू, निखिल चोप्रा, किरण मोरे, अजित आगरकर, संजय बांगर.
इंग्रजी समालोचक : इयान बिशप, सायमन डोल, कुमार संगकारा, हर्षा भोगले, सुनील गावस्कर, रोहन गावस्कर, दीप दासगुप्ता, शिवा रामाकृष्णन, अंजुम चोप्रा, मुरली कार्तिक, मार्क निकोलस, केवीन पीटरसन, जेपी ड्यूमिनी, लिसा स्थेलकर, डेरेन गंगा, पोमी बांगवा, मायकल स्लेटर आणि डैनी मॉरिसन.
डगआऊट समालोचक : डीन जोन्स, स्कॉट स्टायरिस, ब्रायन लारा, ब्रेट ली, ग्रीम स्वान