झुवारी नगर, सांकवाळ येथे एका कुटुंबावर प्राणघातक हल्ला; एकजण गंभीर जखमी

सांकवाळमधील झुवारी नगर येथे एका कुटुंबावर लोखंडी सळ्या, दगड व चॉपरने प्राणघातक हल्ला करण्यात आला. यात एक जण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर मडगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
just now
झुवारी नगर, सांकवाळ येथे एका कुटुंबावर प्राणघातक हल्ला; एकजण गंभीर जखमी

वास्को : सांकवाळ येथील झुवारी नगर भागात एका कुटुंबावर लोखंडी सळ्या, दगड आणि चॉपरने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. हल्ल्यामध्ये कुटुंबातील एका सदस्याच्या गळ्यावर चाकूने गंभीर वार झाल्यामुळे तो व इतर सदस्य जखमी झाले.



घटनेची माहिती मिळताच जखमींना तातडीने प्राथमिक उपचारासाठी कासावली येथे नेण्यात आले; मात्र प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी मडगावच्या दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. या घटनेची माहिती समजताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, परिसराचा ताबा घेत तपास सुरू केला आहे. हल्ल्याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.


हेही वाचा
सर्व पहा