कुडचडे : कुडचडेतील औद्योगिक वसाहतीत नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेला गोव्यात आणल्यानंतर निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी कुडचडे पोलिसांनी मध्यप्रदेशातील रॉबिन मार्क्स (३० वर्षे) या संशयित युवकाला अटक केली. (Woman raped on pretext of job offer youth from Madhya Pradesh arrested)
उपअधीक्षक नीलेश राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नोकरी देण्याच्या बहाण्याने वरील युवकाने पती व पत्नीला गोव्यात आणले. नंतर नोकरी देण्याच्या बहाण्याने औद्योगिक वसाहतीतील निर्जन ठिकाणी नेऊन महिलेवर बलात्कार केला. माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ संशयित युवकाला ताब्यात घेतले व नंतर गुन्हा नोंदवून अटक केली. महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले असून, अधिक तपास कुडचडे पोलीस करीत आहेत.
दरम्यान, वाढत्या बलात्काराच्या घटनांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. आरोपींना गजाआड करून कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.


